Covid-19 App: कोरोना विषाणूसंदर्भातील चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी WHO चे मोठे पाऊल; संस्थेकडून कोविड-19 अॅप लाँच
WHO (PC - Facebook)

Covid-19 App: कोरोनासंदर्भातील चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी डब्ल्यूएचओने मोठे पाऊल उचलले आहे. कोरोना व्हायरसविषयी नवीन अपडेट देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वापरकर्त्यांसाठी मोबाईल अॅप लाँच केले आहे. डब्ल्यूएचओ कोविड-19 अॅप, असं या अॅपचं नाव आहे. हे अॅप डब्ल्यूएचओ आणि प्रादेशिक भागीदार दोघांकडून विश्वसनीय अपडेट आणि वैज्ञानिक निष्कर्षांची माहिती प्रदान करेल. डब्ल्यूएचओने या वर्षाच्या सुरूवातीस कोरोना विषाणूसंदर्भात अपडेट देण्यासाठी अशा प्रकारचे अॅप लाँच केले होते. हे अॅप आइओएस 9.0 आणि अँड्राएड 4.4 डिव्हाइसमध्ये कार्य करते. 2011 पासून लाँच केलेले बहुतेक स्मार्टफोन या दोन प्रकारांत मोडतात. हे अ‍ॅप एकाच वेळी विविध देशांमधील डब्ल्यूएचओच्या कर्मचार्‍यांच्या टीमने विकसित केले होते. (हेही वाचा - US: डोनाल्ड ट्रंम्प यांची COVID19 Relief Package वर स्वाक्षरी, अमेरिकेतील नागरिकांना मिळणार आर्थिक मदत)

काय आहे नवीन अ‍ॅपमध्ये?

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, या अ‍ॅपच्या माध्यमातून वापरकर्ते कोरोना विषाणूच्या आजाराची लक्षणे आणि व्हायरसपासून स्वत: चे आणि त्यांच्या समुदायाचे संरक्षण कसे करावे याबद्दल शिकू शकतात. डब्ल्यूएचओ आणि त्याच्या भागीदारांकडून नियमित अपडेट प्राप्त करण्यासाठी वापरकर्ते त्यांच्या क्षेत्रातून रीअल-टाइम सूचनांसाठी नोंदणी करू शकतात. हे साथीच्या काळात वापरकर्त्यांना विविध मार्गांनी मदत करण्याबद्दल उपयुक्त ठरते. जागतिक आरोग्य संस्था डब्ल्यूएचओचे अॅप भौगोलिकदृष्ट्या अधिक सक्षम बनविण्यासाठी स्थानिक भागधारकांसह कार्य करते. (हेही वाचा -

हे अॅप कुठे उपलब्ध आहे?

हे अॅप सध्या केवळ नायजेरियामध्ये उपलब्ध आहे. सध्या या अॅपची प्राथमिक चाचणी घेण्यात येत आहे. भविष्यात सर्व इंग्रजी भाषिक देशांना हे अॅप उपलब्ध करून देण्यावर डब्ल्यूएचओ काम करत आहे.

हे अॅप का लाँच करण्यात आले आहे?

चुकीच्या माहितीच्या अनियंत्रित प्रसारामुळे कोरोना साथीच्या आजाराशी लढा देण्याच्या डब्ल्यूएचओच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे हे अ‍ॅप सुरू झाल्यानंतर एजन्सी फक्त सत्यापित आणि वैज्ञानिकदृष्ट्या अचूक माहिती नागरिकांना देईल.