उत्तर आफ्रिकी देश दक्षिण सुदानमधील (South Sudan) एक व्हिडिओ समोर आल्यानंतर येथे सहा पत्रकारांना ताब्यात घेण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये दक्षिण सुदानचे राष्ट्राध्यक्ष साल्वा कीर (Salva Kiir) त्यांच्या पॅन्टमध्ये लघवी करताना दिसत आहेत. डिसेंबरमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रगीतादरम्यान, राष्ट्रपती साल्वा कीर यांच्या राखाडी पँटवर एक काळा डाग पसरलेला दिसला आणि जमिनीवरही एक ओला डाग दिसला. आता या घटनेचा व्हिडीओ याच सहा पत्रकारांनी सोशल मिडियावर शेअर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, रोड कमिशनिंग कार्यक्रमात 71 वर्षीय राष्ट्रपती राष्ट्रगीतासाठी उभे राहिले होते. त्यावेळी काही पत्रकारांनी एक व्हिडीओ शूट केला ज्यामध्ये राष्ट्रपती कथितरीत्या लघवी करताना दिसत होते. हा व्हिडिओ टेलिव्हिजनवर प्रसारित झाला नसला तरी नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. दक्षिण सुदान युनियन ऑफ जर्नालिस्टचे अध्यक्ष पॅट्रिक ओएट यांनी सांगितले की, राज्य-संचालित दक्षिण सुदान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना मंगळवारी आणि बुधवारी ताब्यात घेण्यात आले.
It could always be worse.
We could be South Sudan:
Six journalists have been detained by South Sudan security forces for disseminating footage of the nation’s president Salva Kiir apparently urinating on himself at an official event. pic.twitter.com/gsc9cMxM76
— Prodigal (@ProdigalThe3rd) January 7, 2023
परंतु राष्ट्रपतींचा लघवी करतानाचा व्हिडीओ कसा समोर आला, याबाबत अजूनही आपल्याला शंका असल्याचे ते म्हणाले. पत्रकारांच्या हितासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स (सीपीजे) ने या पत्रकारांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आफ्रिकन देशांमध्ये लोकांना अटक करण्याची हीच पद्धत आहे. जेव्हा अधिकाऱ्यांना असे वाटते की एखादे कव्हरेज त्यांना हवे तसे घडले नाही तेव्हा ते पत्रकारांना अटक करतात. (हेही वाचा: पत्नीने घटस्फोट मागितल्यावर पतीने संपूर्ण कुटुंबच संपवले; बायको, 5 मुले आणि सासूवर गोळी झाडून स्वतः केली आत्महत्या)
कीर यांचा हा लघुशंकेचा व्हिडिओ गेल्या महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये राष्ट्राध्यक्षांची स्थिती पाहून त्यांच्या आरोग्यावर आणि गरिबी व उपासमारीने त्रस्त दक्षिण सुदान चालवण्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीबाबत उपस्थित प्रश्नांकडे अधिकाऱ्यांनी नेहमीच टाळाटाळ केली आहे. 2011 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून साल्वा कीर हे दक्षिण सुदानचे अध्यक्ष आहेत.