Joe Biden | (Photo Credits: Facebook)

अमेरिकेमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या सभेत गोळीबार झाला आहे. ट्र्म्प यामध्ये सुरक्षित बचावले आहेत. Pennsylvania च्या सभेत ट्र्म्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांनीही निषेध केला आहे. 'आता ट्र्म्प ठीक आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत पण अशाप्रकारच्या हिंसाचाराला अमेरिकेमध्ये स्थान नसेल. सार्‍या secret service चे आभार मानत त्यांनी ट्रम्प यांची रॅली शांततेमध्ये पार पडावी अशी आशा व्यक्त केली आहे. Delaware येथून बोलताना बिडेन यांनी या हल्ल्याचे वर्णन "SICK" असे केले आणि अशा घटना रोखण्यासाठी एकजुटीच्या गरजेवर भर दिला आहे. PM Modi Condemns Attack On Donald Trump: 'राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही', डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा पंतप्रधान मोदींकडून निषेध .

Joe Biden यांनी केला गोळीबाराचा निषेध

ट्रम्प यांच्यावरील हल्ला हा हत्येचा प्रयत्न होता का असे विचारले असता, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, "मला पुरेशी माहिती नाही. माझ्याकडे एक मत आहे, परंतु माझ्याकडे कोणतेही तथ्य नाही, म्हणून मी हे करण्यापूर्वी मला खात्री करून घ्यायची ती माहिती घेऊन पुन्हा समोर येईन".

शनिवारी पेनसिल्व्हेनिया येथे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबाराच्या वेळी गोळी लागल्याने उपस्थितांपैकी एकाचा मृत्यू झाला, CNN ने बटलर काउंटीचे जिल्हा वकील Richard Goldinger चा हवाला देऊन वृत्त दिले आहे. सीक्रेट सर्व्हिसने शूटरलाही ठार मारल्याचं वृत्त आहे. 

2024 च्या यूएस अध्यक्षीय निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने शनिवारी बटलर, पेनसिल्व्हेनिया येथे ट्रम्प यांच्या रॅलीमध्ये व्यत्यय आला आहे. यूएस सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी ट्रम्प यांना गोळीबारानंतर ताबडतोब स्टेजवरून बाहेर काढले त्यांच्या केवळ कानाला गोळी चाटून गेली आहे.