New York: लाजिरवाणे कृत्य! TSA एजंटने JFK विमानतळावर ट्रान्सजेंडर महिलेलेच्या गुप्तांगावर मारला ठोसा; पीडितेने सोशल मीडियावर मांडली व्यथा
TSA Agent Punches Transgender Woman in testicles JFK Airport (PC - Twitter| @nypost)

New York: न्यूयार्क शहरातील JFK विमानतळावर एका ट्रान्सजेंडर महिलेसोबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याची घटना घडली आहे. विमानतळावर एका TSA एजंटने ट्रान्सजेंडर महिलेच्या गुप्तांगावर ठोसा मारला. या सर्व प्रकारामुळे जेएफके विमानतळावर एट्रान्सजेंडर महिलेला अश्रू अनावर झाले. या घटनेनंतर एका अज्ञात व्यक्तीने पीडितेला या सर्व प्रकाराबद्दल सोशल मीडियावर माहिती देण्यास सांगितले.

यानंतर पीडितेने सोशल मीडियावर पोस्टमध्ये सांगितले की, "हाय. jfk विमानतळावरील एका tsa एजंटने मला गुप्तांगावर ठोसा मारला. तो माझ्यावर ओरडला आणि त्याने माझा सर्वांसमोर अपमान केला." परंतु, महिलेच्या म्हणण्यानुसार, हा सर्व प्रकार येथेचं थांबला नाही. (हेही वाचा - World’s First Beer Powder: आता बाजारात आली 'बिअर पावडर'; अवघ्या काही मिनिटांत थंडगार ड्रिंक तयार, जाणून घ्या सविस्तर)

पीडित महिलेने दुसऱ्या एका पोस्टमध्ये सांगितले की, "TSA एजंट महिलांच्या बाथरूममध्ये माझ्यामागे आला. मी एका स्टॉलवर रडत असताना माझ्याबद्दल एका सहकर्मीशी बोलू लागला." तिने आपल्या पोस्टमध्ये मित्रांना घडलेल्या प्रकाराबद्दल तिने काय करावे? याबद्दल सल्ला मागितला.

फॉलो-अप पोस्टमध्ये तिने सांगितले की, तीव्र वेदना होत असल्याने ती एक तासापेक्षा जास्त रडत राहिली. तिने दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'तिला TSA एजंटला काढून टाकण्याची इच्छा नाही. परंतु, या एजंटचे संपूर्ण tsa पूर्णपणे रद्द करावे, अशी मागणी पीडितेने केली आहे. महिलेच्या पोस्टला प्रतिसाद म्हणून, जेएफके विमानतळाने या घटनेबद्दल माफी मागितली आहे.