Tourist Opens Plane Door Before Takeoff: थायलंडमध्ये टेकऑफ करण्यापूर्वी पर्यटकाने उघडला विमानाचा दरवाजा; पुढे काय झालं? वाचा
Flight | Representational image (Photo Credits: pxhere)

Tourist Opens Plane Door Before Takeoff: थायलंडमध्ये टेकऑफ (Takeoff) करण्यापूर्वी पर्यटकाने (Canadian Tourist) विमानाचा दरवाजा उघडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, चियांग माई विमानतळावर (Chiang Mai Airport) पर्यटकाने टेकऑफ करण्यापूर्वी थाई एअरवेज (Thai Airways) च्या फ्लाइटचा आपत्कालीन एक्झिट दरवाजा उघडला. त्यानंतर या पर्यटकाला ताब्यात घेण्यात आले. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे टेकऑफला विलंब झाला. यासंदर्भात रॉयटर्सने वृत्त दिले आहे.

कॅनेडियन व्यक्तीला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रवाशाच्या वकिलाने दावा केला की, 'जेव्हा त्याने विमानाचा दरवाजा उघडला तेव्हा तो भ्रमित झाला होता. त्याने कबूल केले की त्याने दार उघडले. कारण लोक त्याच्या मागे येत होते. त्याच्या वागण्यावरून, तो भ्रमित झाला असावा.' (वाचा - Turkey Helicopter Crash: तुर्कीतील गझियानटेप प्रांतात हेलिकॉप्टर कोसळले; दोन पायलट ठार, एक जखमी)

या घटनेची पुष्टी करताना, चियांग माई विमानतळाचे संचालक रोन्नाकोर्न चालर्मसेन्याकॉर्न म्हणाले की, विमान टर्मिनलवर परतले. तंत्रज्ञांनी सुरक्षा तपासणी केल्यानंतर विमानाने पुन्हा उड्डाण घेतलं. या घटनेमुळे विमानतळावरील डझनहून अधिक उड्डाणे प्रभावित झाल्याचे चालर्मसेनयाकोर्न यांनी सांगितले. (हेही वाचा - London: थट्टा म्हणून पाठवला विमान उडवून देण्याचा संदेश; भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याला भरावा लागणार 20 लाखांचा दंड)

अनन्या तियांगते नावाच्या एका प्रवाशाने सांगितले की, त्या व्यक्तीने आपत्कालीन एक्झिट उघडताच विमानात गोंधळ उडाला. गेल्या महिन्यात मेक्सिकोमध्ये एका व्यक्तीला विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडून विंगवर चालल्याने अटक करण्यात आली होती.