London: ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याला (Indian-Origin Student) स्नॅपचॅटवर विनोद म्हणून त्याच्या मित्रांना विमान उडवण्याबाबत संदेश पाठवणे महागात पडले आहे. त्याच्यावर आता स्पेनमध्ये खटला सुरू आहे. त्यांच्यावर सार्वजनिक अव्यवस्था निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बाथ युनिव्हर्सिटीचा अर्थशास्त्राचा विद्यार्थी आदित्य वर्मा जुलै 2022 मध्ये मित्रांसह मेनोर्का बेटावर जात होता. यावेळी त्यांनी स्नॅपचॅटवर मेसेज केला होता. गॅटविक विमानतळावरून उड्डाण करण्यापूर्वी वर्मा याने पाठवलेल्या संदेशात म्हटले होते की, मी विमान उडवणार असून मी तालिबानचा सदस्य आहे. त्यानंतर आदित्य वर्माला अटक करून दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. (हेही वाचा - Turkish Military Plane Emergency Landing Video: तुर्की लष्करी विमानाचे आपत्कालीन लँडिंग (Watch Video))
सोमवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीत सांगण्यात आले की, हा संदेश ब्रिटिश सुरक्षा सेवेने गॅटविकच्या वाय-फाय नेटवर्कवर रोखला होता. त्यानंतर स्पॅनिश अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले होते. त्यानंतर आदित्य वर्मा ज्या विमानातून प्रवास करत होता त्या विमानाच्या मागे दोन स्पॅनिश F-18 लढाऊ विमाने पाठवण्यात आली. (हेही वाचा - Saudi Arabia's 1st Alcohol Store: सौदी अरेबियात उघडणार पहिले दारूचे दुकान; निर्बंधांसह मिळणार मद्य, जाणून घ्या सविस्तर)
20 लाखांचा दंड -
कोर्टात आदित्यने सांगितले की, हा मेसेज एका खाजगी ग्रुपमध्ये विनोद म्हणून पाठवण्यात आला होता. त्याचा कधीही सार्वजनिक त्रास किंवा हानी पोहोचवण्याचा हेतू नव्हता. वर्मा याला दोषी आढळल्यास 22,500 युरो (20,28,915 रुपये) पर्यंत दंड होऊ शकतो.