Turkey Helicopter Crash: तुर्कीतील गझियानटेप प्रांतात हेलिकॉप्टर कोसळले; दोन पायलट ठार, एक जखमी
Helicopter Crash प्रतिकात्मक प्रतिमा (PC- pixabay)

Turkey Helicopter Crash: तुर्कस्तान (Turkey) च्या गझियानटेप प्रांतात (Gaziantep Province) हेलिकॉप्टर कोसळल्याची (Helicopter Crash) घटना घडली आहे. या अपघातात (Accident) दोन क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला असून एक तंत्रज्ञ गंभीर जखमी झाला आहे. हेलिकॉप्टरने दक्षिण हाते प्रांतातून उड्डाण केले, परंतु रात्री 10:49 वाजता हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, तुर्कीचे अंतर्गत मंत्री अली येरलिकाया यांनी सोशल मीडिया 'X' वर सांगितले की, सुरक्षा एव्हिएशन विभागाच्या जनरल डायरेक्टरेटच्या यादीत नोंदणीकृत हेलिकॉप्टर नूरदगी जिल्ह्यातील कारताल गावात कोसळले.

येरलिकाया यांनी पुढे सांगितले की, दक्षिण हाते प्रांतातून उड्डाण घेतलेल्या हेलिकॉप्टरचा शनिवारी रात्री उशिरा स्थानिक वेळेनुसार 10:49 वाजता शेवटचा संपर्क झाला. अल्लाह आमच्या वीर वैमानिकांच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. जखमी तंत्रज्ञ लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. (हेही वाचा -Chile Forest Fire: चिलीच्या जंगलात भीषण आग, 46 जणांचा मृत्यू)

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या तंत्रज्ञाला चांगल्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

गेल्या वर्षी उत्तर-पश्चिम तुर्कीमध्ये एका भीषण रस्ता अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तसेच 50 हून अधिक जण जखमी झाले होते. साकर्या प्रांतातील उत्तरी मारमारा रोडवर तीन बस आणि ट्रकसह सात वाहनांची धडक होऊन हा अपघात झाला होता.