Wildfire | Representational image (Photo Credits: pxhere)

चिलीच्या जंगलामध्ये भीषण आग (Chile Wild Fire) लागल्याने हाहाकार माजला आहे. मध्य आणि दक्षिण चिलीच्या जंगलामध्ये (Wild Fire) आगीमुळे आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. चिलीच्या राष्ट्रपतींनी याची पुष्टी केलीय. आगीमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीमच्या वतीने आगीमुळे भस्मसात झालेल्या घरांचा तपास सुरु झाला आहे. चिली सरकारने आणीबाणीची घोषणा केली आहे. (हेही वाचा - Europe Farmers' Protests: संपूर्ण युरोपमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन, जाणून घ्या कारण)

चिली  येथील तापमान 40 अंशांवर पोहोचलं आहे. त्यामुळेच संकट आणखीनच वाढलं आहे. ही आग मुख्यत्वे करुन वालपरिसो पर्यटन क्षेत्राच्या आसपास लागली आहे. येथील हजारो हेक्टरवरील जंगल नष्ट झालेलं आहे. किनाऱ्यालगतच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर धूर वाढला असून लोकांनी घरं सोडून जाण्यास सुरुवात केलीय.

चिलीच्या राजधानीच्या नैऋत्येकडील एस्ट्रेला आणि नवीदाद या शहरातील एक हजार घरं जळून खाक झाली आहेत. पिचिलेमूच्या सर्फिंग रिसॉर्टजवळील लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं आहे. आणखीही अनेकांना घरं सोडून जावं लागणार असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.