Hollywood Movie On Plumber: रानू मंडल पेक्षाही वेगाने बदलले 'प्लंबर'चे नशीब; हॉलिवूड चित्रपटात पाहायला मिळणार Kev Crane चा जीवनप्रवास
Kev Crane (PC - Twitter)

Hollywood Movie On Plumber: भारतीय गायिका रानू मंडलचे नशीबही एका रात्रीत बदलले होते. पूर्वी ती स्टेशनवर गायची. त्यानंतर तिचे गाणे खूपचं व्हायरल होऊ लागले. एका रात्रीत रानूचं नशीब बदललं होतं. नशीब बदलायला वेळ लागत नाही असं म्हणतात. असाच काहीसा प्रकार एका प्लंबरसोबत घडला. वास्तविक, प्लंबर म्हणून काम करणारी ही व्यक्ती एका संगीत निर्मात्याच्या घरी कामाला गेली होती. घराच्या बाथरूममध्ये काम करत असताना प्लंबर गाणी म्हणत होता. संगीत निर्माता त्याच्या गाण्याने इतका प्रभावित झाला की, त्याने प्लंबरसोबत गाणे रेकॉर्ड करण्याची घोषणा केली. आता एका हॉलिवूड चित्रपट निर्मात्यानेही प्लंबरच्या या कथेवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे.

'द मिरर'च्या वृत्तानुसार, केव्ह क्रेन (Kev Crane) असे या प्लंबरचे नाव असून तो मूळचा यूकेच्या Leicestershire चा आहे. केव्हचे वय 50 वर्ष आहे. साधे जीवन जगत असताना, त्याने संगीत निर्माता पॉल कॉनली (Paul Conneally) सोबत गाणे रेकॉर्ड केले. त्यानंतर तो प्रकाशझोतात आला. कॉनलीने पहिल्यांदा केव्हला त्याचे बाथरूम दुरुस्त करताना गाताना ऐकले. प्लंबर ते गायक आणि नंतर हॉलिवूड चित्रपट. केव्ह क्रेन हा प्रवास खूप रंजक आहे. (हेही वाचा - समुद्रात माशाचे फोटो काढल्यानंतर तरुणाने माशाच्याऐवजी मोबाईल फेकला पाण्यात, Watch Viral Video)

प्लंबर म्हणून काम करत असताना केव गीतलेखनाचेही काम करत होते. दरम्यान, पॉल कॉनलीने त्याला गाताना ऐकल्यावर त्याच्यासोबत गायनाचा करार केला आणि काही दिवसांनंतर त्याचा पहिला अल्बम Why Can't I Be You? प्रकाशित झाला. त्यांचे हे गाणे खूप प्रसिद्ध झाले, त्यानंतर कॉनलीने केवसोबत आणखी बरीच गाणी गायली.

दरम्यान, म्युझिक अल्बम लाँच झाल्यानंतर केव क्रेनची कथा सोशल मीडियावर लोकप्रिय झाली. त्यांची गाणी लोकांना खूप आवडतात. अलीकडे, लॉस एंजेलिस-आधारित चित्रपट निर्माता स्टेसी शर्मन आणि अमेरिकन पटकथा लेखक आणि निर्माता बिली रे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्याने केवसोबत करार केला आहे. त्यानुसार त्याची कथा लवकरच हॉलीवूडवर दाखवण्यात येणार आहे.

त्याच्या या प्रवासाबाबत केव सांगतो की, हे सर्व दुसऱ्यासोबत घडताना पाहण्यासारखे होते. माझ्यासोबत असे घडेलं, असं मला एका मिनिटासाठीही वाटले नव्हते. या संपूर्ण कथेचा विचार करताच माझी झोप उडाली. आधी गाण्याच्या रेकॉर्डिंगचा करार आणि आता चित्रपट, हे खूपच रोमांचक आहे. केव अजूनही प्लंबर म्हणून काम करत आहे. वेळ मिळेल तेव्हा गाणी रेकॉर्ड करायलाही जातो.