कॅलिफोर्निया (California) येथून अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आलेत यात भारतीय वंशाचे आठ महिन्यांचे बाळ, त्याचे आई-वडील आणि काकाचा (चुलता) समावेश आहे. या कुटुंबाचे कॅलिफोर्निया येथून काही दिवसांपूर्वीच अपहरण झाले होते. स्थानिक अधिकाऱ्यांनीही या घटनेची पुष्टी केली आहे. स्थानिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, हे कुटुंब भारतीय वंशाचे असून सोमवारी बेपत्ता झाले होते. आतापर्यंत अपहरणाच्या गुन्ह्यात एका ४८ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, मर्सिड काउंटी शेरीफ व्हर्न वॉर्नके म्हणाले, ही घटना अत्यंत भयानक आणि धक्कादायक आहे. या प्रकरणात ज्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे तो एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतो आहे. तो एका कुटुंबला जबरदस्तीने ट्रकमध्ये बसवतानाही दिसतो आहे.
प्राप्त माहितीनुसार, आठ महिन्यांचे अर्भक, तिचे आई-वडील जसलीन कौर आणि जसदीप सिंग आणि काका अमनदीप सिंग हे सोमवारपासून बेपत्ता होते. काही काळ वाट पाहिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडे मदत मागितली होती. (हेही वाचा, Mexico Shooting: मेक्सिकोमध्ये गोळीबार, 7 पोलिस आणि महापौरांसह 18 जणांचा मृत्यू)
मर्सिड काउंटी शेरीफ व्हर्न वॉर्नके म्हणाले की, या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती सध्या कोठडीत आहे. या व्यक्तीला 2005 मध्ये सशस्त्र दरोडा आणि खोट्या तुरुंगवासाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणात आणखीही काही लोक असण्याची शक्यता व्हर्ना वॉर्नके यांनी व्यक्त केली.
पोलिसांकडे असलेल्या पुराव्यांपैकी एक असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, जसदीप आणि अमनदीप यांचे कुटुंब नऊ मिनिटांच्या अंतराने एका व्यावसायिक ट्रकमधून येताना दिसले. जसदीपला कचरा पिशवी घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीशी काही चर्चा करतानाही व्हिडिोत पाहायला मिळाले. ज्या व्यक्तीच्या हातात बंदूक असल्याचेही दिसते. या व्हिडिओनंतर पोलिसांचा संशय वाढला आहे.