Madhya Pradesh Crime: गर्लफ्रेंडवरून वाद, दोन विद्यार्थ्यांचे अपहरण करून बेदम मारहाण
ग्वाल्हेरमध्ये मंगळवारी रात्री साडेसात वाजता दोन विद्यार्थ्यांचे अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपहरण केल्यानंतर त्यांना इटालियन गार्डन परिसरात घेऊन जाऊन तेथे बेदम मारहाण केले.
Madhya Pradesh Crime: ग्वाल्हेरमध्ये मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता दोन विद्यार्थ्यांचे अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपहरण केल्यानंतर त्यांना इटालियन गार्डन परिसरात घेऊन जाऊन तेथे बेदम मारहाण केले. या घटनेनंतर परिसरात दहशत पसरली आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत आहे. अपहरण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- पेशंटच्या मृत्यूमुळे रुग्णालयात डॉक्टरला बेदम मारहाण; सीसीटीव्ही व्हिडिओ समोर येताच पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, लालू यादव आणि सोनू यादव असं अपहरण झालेल्या तरुणांची नावे आहे. दोघे विद्यार्थी शहरातील पडाव परिसरात राहतात. दोघेही मूळचे विजपूरचे आहे. दोघे जण स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे. काल रात्री ते त्यांच्या मित्रांसोबत इटालियन गार्डनजवळ असताना अचानक त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात कारने धडक दिली. त्यानंतर काही जणांनी कारमधून बाहेर येऊन त्यांना मारहाण करून घटनास्थळावरून पळवून नेले.
हेही वाचा-
MP: Two students thrashed and forcibly kidnapped from Gwalior's Italian Garden over a girl-related dispute.#MadhyaPradesh #Gwalior pic.twitter.com/cD6bKzqVj9
— Free Press Madhya Pradesh (@FreePressMP) July 24, 2024
तीन तासांनंतर अपहरण करणाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कांच मिलजवळ सोडून दिले. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी विद्यार्थ्यांशी चौकशी केली. एका मुलीशी असलेल्या वादा संदर्भात अपहरण करण्यात आल्याचे समोर आले. अपहरणकर्त्यांचा विद्यार्थ्यांशी महिनाभरापूर्वी वाद झाला होता. पोलिसांनी एकाला अटक केले आहे. अन्य पाच जणांचा शोध सुरु आहे. या घटने मागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 24, 2024 01:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

