Lucknow: उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर केजीएमयूमधील न्यूरोसर्जरी विभागाचे माजी एचओडी डॉ रवी देव यांच्यावर हल्ला करण्यात आला. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केल्याची घटना गोमती नगर एक्स्टेंशन येथील इग्निस हॉस्पिटलमध्ये घडली आहे. 24 जुलै रोजी समोर आलेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये डॉक्टरांना मारणारा एक गट दिसत आहे.घडलेल्या घटनेवर लखनऊ पोलिसांनी प्रतिक्रीया दिली, 'डॉक्टरला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे, आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे, गुन्हा नोंदविला जाईल आणि आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल.'

व्हिडीओ पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)