Taliban कडून Afghanistan मधील सर्वात मोठं दुसरं शहर Kandahar वर ताबा
Taliban Attack (Representational Image/ Photo Credit: Getty)

अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये दहशती कारवाया सुरू आहेत. सध्या अफगाणिस्तान मधील दुसरं सर्वात मोठं शहर कंदहार (Kandahar) वर तालिबान्यांनी कब्जा मिळवला आहे. Sputnik ने स्थानिक प्रशासनाच्या दुजोर्‍याने हे वृत्त दिले आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तालिबानने आता आपला जोर वाढावला आहे. तालिब्यान्यांकडून अफगाणिस्तान मध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू असून शुक्रवारी कंदहार त्यांनी मिळवला आहे. काबूल नंतर कंदहार हे अफगाणिस्तान मधील सर्वात मोठं शहर आहे.

काही दिवसांपूर्वी कंदहार मध्येच भारतीय फोटोग्राफर दानिश याची तालिबान्यांकडून निर्घूण हत्या करण्यात आली होती. FDD's Long War Journal च्या माहितीनुसार, अफगाणिस्तान मध्ये 34 पैकी 10 पेक्षा जास्त प्रशासकीय केंद्र तालिबान्यांकडे आहेत. तर राजधानी शहरावर ताबा मिळवण्यामध्ये आता केवळ काबूल वगळता इतर राजधानी शहरांवर त्यांचे वर्चस्व आहे. गझनी वर देखील ताबा मिळवला आहे.

तालिबान्यांची ही दहशती कारवाई मे 2021 पासून सुरू झाली आहे. हळूहळू त्यांनी महत्त्वाच्या ठिकाणी आपलं वर्चस्व स्थापन करायला सुरूवात केली. 34 पैकी 8 सारी प्रोव्हिन्स सध्या तालिबान्यांकडे आहेत. Taliban in Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये पसरत असलेल्या तालिबान विरोधात रशिद खानची जागतिक नेत्यांकडे मागणी, देशात शांतता प्रस्थापित करण्याचे केले आवाहन.

दरम्यान अफगाणिस्तान मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि तालिबान्यांसोबत वाटाघाटी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सरकार कडून देण्यात आली आहे.