Coronavirus: कोरोना विषाणू पसरवल्याचा संशय असणारा स्टिव्ह वॉल्श अखेर सापडला
Coronavirus super spreader Steve Walsh (PC - facebook)

चीनमध्ये कोरोनाचा विषाणू (Coronavirus) पसरवल्याचा संशय असणारा स्टिव्ह वॉल्श (Steve Walsh) नावाचा व्यक्ती अखेर सापडला आहे. स्टिव्ह वॉल्शवर कोरोना विषाणू पसरवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. व्यावसायिक असणारा 53 वर्षीय स्टिव्ह वॉल्श हा ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहे. सध्या त्याच्यावर लंडनमधल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्टिव्हची प्रकृती सध्या पूर्णपणे बरी आहे. स्टिव्ह यांच्या माध्यमातून इतर देशांमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरला, असं म्हटलं जात आहे.

स्टिव्ह यांना जानेवारीमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाली होती. ते ब्रिटनमधील गॅस अ‍ॅनलिटिक्स कंपनी सर्वोमॅक्सच्या विक्री परिषदेला गेले होते. या परिषदेला उपस्थित असलेल्या चिनी शिष्टमंडळाकडून स्टिव्ह यांना कोरोना व्हायरसची लागल झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, या शिष्टमंडळाची वैद्यकीय चाचणी निगेटिव्ह होती. सर्वोमॅक्सने स्टिव्ह यांचा फोटो प्रसिद्ध करत त्यांना 'सुपर स्प्रेडर' म्हटलं. तेव्हापासून स्टिव्ह यांचा शोध घेणं चालू होतं. (हेही वाचा - जपानमधील 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवरील आणखी एका भारतीय नागरिकाला कोरोनाचा संसर्ग)

सर्वोमॅक्सच्या परिषदेहून मलेशियाला परतलेल्या एका व्यक्तीच्या शरीरात कोरोना विषाणू आढळला. या परिषदेत एकूण 109 जणांचा समावेश होता. परिषद संपल्यानंतर यातील 94 लोक आपल्या देशात गेले. त्यामुळे कोरोना जागतिक पातळीवर पसरत गेला. चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. भारतात केरळ राज्यात काही दिवसांपूर्वी कोरोनाचे रुग्ण आढळले होते. जपानमधील योकोहामा बंदरावर उभ्या असलेल्या 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवर 100 पेक्षा जास्त भारतीय अडकले आहेत. या क्रूझरवर अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. येथे अडकलेल्या एका भारतीय नागरिकालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी समोर आली आहे.