 
                                                                 रशिया (Russia) निर्मित कोविड-19 लस (Covid-19 Vaccine) स्पुटनिक व्ही (Sputnik V) प्राण्यांसाठी देखील वापरली जावू शकते, अशी माहिती Gamaleya National Center of Epidemiology and Microbiology चे प्रमुख Alexander Gintsburg यांनी दिली आहे. स्पुटनिक व्ही ही लस Gamaleya National Center of Epidemiology and Microbiology आणि Russian Direct Investment Fund यांनी एकत्रितपणे मिळून बनवली आहे.
Sputnik News शी बोलताना Alexander Gintsburg म्हणाले की, "मला पूर्ण विश्वास आहे की, स्पुटनिक व्ही ही लस प्राण्यांवर देखील पूर्णपणे उपयुक्त ठरेल. परंतु, सध्याच्या काळामध्ये आपण माणसांना आधी ही लस देणे गरजेचे आहे. माणसांना लस देऊन झाल्यानंतर प्राण्यांसुद्धा लस देणे गरजेचे आहे. प्राण्यांच्या सुरक्षेच्या आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने हे अत्यंत गरजेचे आहे. प्राण्यांसाठी बनवलेल्या लसीचे नाव Carnivac-Cov असे आहे."
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून Carnivac-Cov लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु झाले आहे. ग्रीस, ऑस्ट्रेलिया, पोलंड, कॅनडा, अमेरिका आणि सिंगापूर यांसारखे देश ही लस प्राण्यांसाठी विकत घेण्यास उत्सुक आहेत. स्पुटनिक व्ही ही लस गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रशियात रजिस्ट्रर झाली होती. कोणत्याही देशामध्ये रजिस्ट्रर होणारी ही जगातील पहिली लस होती. ही लस घेतलेल्या व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असून त्यामुळे दोन वर्षांपर्यंत कोरोनापासून सुरक्षित राहू शकता, अशी माहिती रशियाने दिली होती. (Sputnik V रशियाच्या COVID-19 Vaccine ला भारतामध्ये DCGI कडून मंजुरी; RDIF ची माहिती)
दरम्यान, स्पुटनिक व्ही ही लस 95 टक्के प्रभावी आहे. भारतातील हैद्राबाद स्थित डॉ. रेड्डीज लॅबरोटरी ला आपात्कालीन वापरासाठी रशियामधून स्पुटनिक व्ही आयात करण्याची परवानगी मिळाली आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
