भारतामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन च्या बरोबरीने आता Sputnik V ही तिसरी कोरोना वायरस विरूद्ध प्रतिबंधात्मक लस बाजारात उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान Russian Direct Investment Fund कडून दिलेल्या माहितीनुसार आता Drug Controller General of India अर्थात DCGI ने देखील Sputnik V ला मंजुरी दिल्याने या भारत हा जगात या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देणारा 60 वा देश ठरला आहे. सध्या देशात मागील काही दिवस वाढते कोरोना संक्रमण आणि लसीचा तुटवडा पाहता ही तिसरी लस देशात अशावेळी आपत्कालीन मंजुरी मिळवणं ही दिलासादायक बाब आहे.
कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड प्रमाणेच भारतात Sputnik V च्या देखील ट्रायल्स झाल्या आहेत. या लसीचा प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार त्याची परिणामकता ही 91.06% आहे. जगात कोविड विरूद्ध लढण्यासाठी सर्वात प्रथम उपलब्ध झालेली लस देखील हीच Sputnik V आहे. भारतात या लसीचे उत्पादन डॉ. रेड्डीज कंपनीकडून करण्यात आले आहे. त्यांनी मागील काही महिन्यांपासून देशात चाचण्या घेतल्या आहे. तर रशियात ही लस रशियन आरोग्य मंत्रालयाने विकसित केलेली आहे. ही लस सुरक्षित असून पहिला डोस घेतल्यानंतर 21 व्या दिवशी दुसरा डोस घ्यायचा आहे. तर या लसीच्या साठवणूकीसाठी देखील विशेष कोल्ड स्टोरेजची गरज नाही. रेफ्रिजरेटर मध्ये 2 ते 8 डिग्री सेल्सियस मध्ये ती सुरक्षित राहू शकते असे देखील सांगण्यात आले आहे. COVID-19 Vaccine Update: 60 वर्षांवरील नागरिकांवर Sputnik V लसीचा वापर करण्यास रशियाची मंजूरी.
#COVID19 | Drug Controller General of India (DCGI) has approved emergency use authorisation of Russian vaccine, Sputnik V pic.twitter.com/lrUH18I9nP
— ANI (@ANI) April 13, 2021
दरम्यान भारतापूर्वी पाकिस्तान, श्रीलंका, व्हिएतनाम, पॅलेस्टिअन, युएई, इराण, इराक सह 60 देशांमध्ये ही लस वापरली जात आहे. जगाच्या 40% पेक्षा अधिक अर्थात 3 बिलियन लोकांसाठी सध्या ही लस तातडीच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Russian Direct Investment Fund ने नुकतेच एक पत्रक जारी करत, भारत सरकारचे याबाबत आभार मानले आहेत.