Somalia Terrorist Attack: अल-शबाब संघटनेकडून सोमालियात दहशतवादी हल्ला, 8 जण ठार; अनेकांना मुंबईतील 26/11 ची आठवण
Hayat Hotel in Mogadishu. (Photo Credit - ANI)

सोमालिया (Somalia) देशाची राजधानी असलेल्या मोगादिशू (Mogadishu) शहरातील एका हॉटेलवर दहशतवादी हल्ला (Somalia Terrorist Attack) झाला आहे. हा हल्ला अल-शबाब (Al-Shabab) नावाच्या दहशतवादी गटातील काही दहशतवाद्यांनी केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 8 जणांना आपले प्राण गमवावे लागल्याचे समजते. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अल-शबाब गटाने मोगादिशू गटाने मोगादिशू शहरात या आधीही दहशतवादी हल्ले केल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच या शहरात शहरात दोन कार बॉम्ब स्फोट आणि काही गोळीबार झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी अल-शबाब गटाने स्वीकारली होती. त्यानंतर अल्पावधीतच अशा प्रकारचा हल्ला झाला आहे. दरम्यान, मोगादिशूच्या आमीन रुग्णवाहिका सेवांचे संचालक आणि संस्थापक अब्दिकादिर अब्दिरहमान यांनी माहिती देताना सांगितले की, हल्ला झालेल्या हॉटेलमधून नऊ जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हल्लेखोरांनी दोन कार बॉम्बने हॉटेल हयातला लक्ष्य केले. एक बॉम्ब हॉटेलजवळील अडथळ्यावर आदळला आणि नंतर दुसरा हॉटेलच्या गेटवर आदळला. आमचा विश्वास आहे की सैनिक हॉटच्या आत आहेत. ते नक्कीच हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर देतील. गुप्तचर यंत्राणांच्या अधिकाऱ्यांनीही पोलिसाच्या वक्तव्याला दुजोरा दिल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Mahatma Gandhi Statue Vandalisedy: महात्मा गांधींच्या पुतळ्याची दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा तोडफोड)

अल-शबाब हा अल-कायदाशी संबंधित दहशतवादी गट आहे. अल-शबाब 10 वर्षांहून अधिक काळ सोमाली सरकार पाडण्यासाठी लढा देत आहे. ते इस्लामिक कायद्याच्या कठोर व्याख्याच्या आधारे स्वतःचे शासन स्थापन करू इच्छित आहेत, असे अल जझीराने वृत्त दिले आहे.

अल-शबाबने यापूर्वीही अशाच प्रकारच्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये, मोगादिशूमधील दुसर्‍या हॉटेलवर झालेल्या हल्ल्यामागे त्यांचा हात होता, ज्यामध्ये किमान 16 लोक मारले गेले होते. आफ्रिकन युनियनच्या सैन्याने 2011 मध्ये अल-शबाबच्या लढवय्यांना राजधानीतून बाहेर काढले होते, परंतू, हा सशस्त्र गट अजूनही ग्रामीण भागातील मोठ्या भागावर नियंत्रण ठेवतो.