Sheikh Hasina India Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीनंतर बांगलादेशच्या पंतप्रधान (Prime Minister of Bangladesh) शेख हसीना (Sheikh Hasina) त्यांच्या दोन दिवसांच्या राज्य दौऱ्यासाठी भारतात परतल्या आहेत. भारतात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर परदेशी नेत्याची ही पहिली द्विपक्षीय राज्य भेट आहे. पीएम मोदी हे त्यांच्या समकक्ष शेख हसीना यांच्यासोबत विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही नेते अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य प्रदान करणाऱ्या करारांवर स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा आहे. शेख हसीना यांचे शनिवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले. समारंभानंतर त्यांनी पीएम मोदींचीही भेट घेतली. (हेही वाचा - Sheikh Hasina Meets PM Modi: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, अनेक महत्त्वपूर्ण करारांवर झाल्या स्वाक्षऱ्या)
"Ceremonial welcome for a special partner": MEA on Bangladesh PM Sheikh Hasina
Read @ANI Story | https://t.co/d7YnQMHamp#MEA #Bangladesh #SheikhHasina pic.twitter.com/SadmHOrX98
— ANI Digital (@ani_digital) June 22, 2024
पहा व्हिडिओ -
#WATCH | Bangladesh Prime Minister Sheikh Hasina and Prime Minister Narendra Modi meet ministers and delegates from each other's countries at the forecourt of Rashtrapati Bhavan. pic.twitter.com/0HcnpwkbsD
— ANI (@ANI) June 22, 2024
मीडिया रिपार्टनुसार, दोन्ही नेत्यांमधील बैठकीत द्विपक्षीय संबंधांना नवीन उंचीवर नेण्यावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. शुक्रवारी नवी दिल्लीत आल्यानंतर पंतप्रधान हसिना यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली आणि अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. X वर झालेल्या बैठकीबद्दल पोस्ट करताना जयशंकर म्हणाले, 'आज संध्याकाळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेऊन मला आनंद झाला. त्यांच्या भारताच्या राज्यभेटीमुळे आमच्यातील घनिष्ठ आणि शाश्वत संबंध अधोरेखित होतात. आमच्या विशेष भागीदारीच्या पुढील विकासासाठी मी त्यांच्या मार्गदर्शनाची प्रशंसा करतो.'
तथापी, भारताच्या 'नेबरहुड फर्स्ट' धोरणांतर्गत, बांगलादेश हा भारताचा एक महत्त्वाचा मित्र आहे. दोन्ही देशांमधील सहकार्य सुरक्षा, व्यापार, वाणिज्य, ऊर्जा, कनेक्टिव्हिटी, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि संरक्षण यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विस्तारले आहे.