Russian Airbus A320 Emergency Landing Video: रशियन प्रवासी एअरबस A320 चे 167 प्रवाशांसह एका शेतात आपत्कालीन लँडींग करण्यात आले. ही घटना सोची येथील ब्लॅक सी रिसॉर्टमधून सायबेरियन शहर ओम्स्ककडे जाताना मंगळवारी (12 सप्टेंबर) घडली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. रशियाने युक्रेवर केलेल्या हल्ल्यामुळे लागू करण्यात आलेल्या पाश्चात्य निर्बंधांमुळे रशियाच्या विमान वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. हा त्याचाच एक परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, नोवोसिबिर्स्क प्रदेशातील जंगलाशेजारी असलेल्या शेतात उतरलेल्या एअरलाइन्सच्या विमानाचे फुटेज अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केले असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, विमानाच्या स्लाइड्स बाहेर होत्या आणि लोक त्याच्या बाहेर शेतात उभे होते.

मॉस्कोच्या विमान वाहतूक एजन्सी रोसाविएत्सियाने एका निवेदनात म्हटले आहे की, मॉस्कोतील स्थानिक वेळेनुसार ही घटना 05.44 वाजता (0244GMT) वाजता घडली. जेव्हा उरल एअरलाइन्सच्या A320 विमानाचे सोची-ओम्स्क मार्गावर अनियोजित लँडिंग यशस्वीरित्या पार पडले. एजन्सीने पुढे आपल्या निवेदानात म्हटले आहे की, सर्व प्रवाशांना जवळच्या गावात ठेवण्यात आले आहे. या प्रवाशांपैकी कोणीही वैद्यकीय मदत घेतली नाही.

व्हिडिओ

रशियाच्या तपास समितीने हवाई वाहतूक सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल विमान कंपनीविरधात फौजदारी खटला दाखल केल्याचे समजते. दरम्यान विमान कंपनीने म्हटले आहे की, "तांत्रिक कारणास्तव विमानाने आपत्कालीन लँडिंग केले." उरल एअरलाइन्स ही येकातेरिनबर्ग शहरात स्थित देशांतर्गत रशियन विमान कंपनी आहे.

विमान अपघात म्हणजे एखाद्या विमानाचा, जसे की विमान किंवा हेलिकॉप्टर, अनियंत्रित उतरण्याचा अनुभव घेते आणि जमिनीवर किंवा अन्य वस्तूवर आदळते. ज्यामुळे विमानाचे नुकसान किंवा सर्वनाश होतो. विमानातील लोकांना इजा किंवा मृत्यू होण्याची शक्यता असते. अनेक घटनांमध्ये मृत्यूही होतो. विमान क्रॅश विविध कारणांमुळे होऊ शकतात.

विमान अपघाताचा धोका कमी करण्यासाठी विमान वाहतूक सुरक्षा उपाय आणि नियम लागू आहेत. हवाई प्रवास हा वाहतुकीच्या सर्वात सुरक्षित प्रकारांपैकी एक आहे. जेव्हा विमान क्रॅश होतात, तेव्हा त्याचे कारण निश्चित करण्यासाठी आणि भविष्यात अशाच घटना टाळण्यासाठी त्यांची विशेषत: कसून चौकशी केली जाते. तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि सुरक्षा प्रक्रियेतील प्रगती सतत विमान वाहतूक सुरक्षिततेत सुधारणा करते.