Photo Credit- X

Emergency Box Office Collection Day 2: अनेक अडथळे आणि वादांनंतर, कंगना राणौतचा (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' (Emergency) हा चित्रपट अखेर 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. पण यावेळी या चित्रपटासह अजय देवगणच्या 'आझाद' चित्रपटही रिलीज झाला आहे. अजय देवगणच्या पुतण्याने 'आझाद'मधून बॉलिबूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याच्यासोबत रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिनेदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. दोन्ही चित्रपटांची सुरुवात कमी झाली. (Arjun Kapoor Injured: अर्जुन कपूरसोबत शूटिंग दरम्यान मोठा अपघात, छतावरून कोसळल्याने अभिनेता जखमी)

पण दुसऱ्या दिवशी आकडेवारी पाहता 'इमर्जन्सी'ने आझादला कलेक्शनच्या बाबतीत मागे टाकले आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर 'सकनिल्क'च्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, 'इमर्जन्सी'ने पहिल्या दिवशी 3.11 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी हा आकडा 4.28 कोटी रुपये होता. यामुळे चित्रपटाने भारतात 7.39 कोटी रुपये कमावले आहेत. तथापि, चित्रपटाचे बजेट 60 कोटी असल्याचे सांगितले जाते. जे अजूनही अपेक्षांपेक्षा खूप लांब आहे. (Fateh Box Office Collection: सोनू सूदच्या 'फतेह' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 21.18 कोटींचा केला व्यवसाय)

राशा थडानी आणि अमन देवगन यांच्या पहिल्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, 1.50 कोटींची ओपनिंग मिळवल्यानंतर, दुसऱ्या दिवशीही चित्रपटाचा आकडा 1.50 कोटींवर राहिला. यामुळे आझादचे कलेक्शन 3 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये कंगना राणौत केवळ अभिनय करतानाच नाही तर दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळताना दिसत आहे. तिने इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. तर 1975 चा राजकीय घडामोडी तिने चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अनुपम खेर (जयप्रकाश नारायण), श्रेयस तळपदे (तरुण अटलबिहारी वाजपेयी) आणि मिलिंद सोमण (फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ) यांच्या भूमिकेत दिसत आहेत.