Monkeypox | Representative Image( Pic Credit-ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीनंतर मंकीपॉक्स (Monkeypox) नावाच्या आजाराने जगभरात गांभीर्य वाढवले आहे. पाठीमागच्या काही दिवसांमध्ये यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओ (WHO) ने सुद्धा मंकीपॉक्स रुग्णांच्या जागत्या वाढीवर काळजी व्यक्त केली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर याबाबत चिंतेचे काहीच कारण नसल्याचेही डब्लुएचओने म्हटले आहे. डब्ल्युएचओ महानिदेशकांनी आयएचआर अपत्कालीन समितीद्वारे या आजाराबाबत देण्यात आलेल्या सल्ल्यांशी सहमती दर्शवत म्हटले आह आहे की, सध्यास्थितीत तरी मंकीपॉक्स आंतरराष्ट्रयी पातळीवर चिंतेचा अजिबात विषय नाही.

डब्ल्युएचओचे महानिदेशक ट्रेड्रोस एडनाम घेब्योयिसस यांनी मंकपॉक्सवरुन आपली चिंता जररु व्यक्त केली आहे. ट्रेड्रोस एडनाम घेब्येयियस यांनी म्हटले की, मंकीपॉक्स व्हायरसचा प्रकार थांबविण्यासाठी तातडीने रणनिती आखण्याची गरज आहे. पश्चिम आणि मध्य अप्रीकी देशांमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच वाढती संख्या पाहायला मिळत आहे. खास करुन अनेक नवे रुग्ण पश्चिम युरोपमधून पुढे येत आहेत. ट्रेड्रोस यांनी म्हटले की, आपत्तालीन समितीने विद्यमान स्थितीबाबत काय काय उपाययोजना करता येऊ शकतील याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. (हेही वाचा, Monkeypox Outbreak: मंकीपॉक्सचा उद्रेक असामान्य आणि चिंताजनक; पुढील आठवड्यात आणीबाणी समितीची बैठक- WHO)

विद्यमान वर्षामध्ये 50 पेक्षा अधिक देशांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आतापर्यंत 3,200 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. समितीने सर्वसंमतीने ही घटना आपत्तालीन असल्याचे म्हटले आहे. तसेच, ही आपत्ती फारशी वाढू नये त्यावर वेळीच नियंत्रण मिळवता यावा येसाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे असे जोर देऊन म्हटले आहे. या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी 16 वैज्ञानिकांसह सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या अभ्यासकांचाही समावेश आहे.

मंकपीपॉक्स आजाराची सुरुवात मोठ्या प्रमाणावर ताप, शररीरावर फोड अशा लक्षणांतून होते. याचा प्रसार रोखण्यासाठी डब्ल्युएचओने जगभरातील नागरिकांमध्ये जाणीवजागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. डब्ल्यूएचओने गुरुवारी मंकीपॉक्स उपाययोजनांबाबत विचारविनिम्य करण्यासाठी बैठक बोलावली होती.