अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांच्या दरम्यान, डब्ल्यूएचओ (WHO) या महामारीशी दोन हात करण्याची तयारी करत आहे. याबाबत डब्ल्यूएचओने तातडीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. डब्लूएचओचे संचालक डॉ. टेड्रोस अधोनम यांनी सांगितले की, मंकीपॉक्सचा उद्रेक असामान्य आणि चिंताजनक आहे. हा उद्रेक आंतरराष्ट्रीय चिंतेची ‘सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ आहे की नाही याचे मूल्यांकन करण्यासाठी पुढील आठवड्यात आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांअंतर्गत आणीबाणी समितीची बैठक बोलावण्याचे ठरवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)