Royal Challengers Bengaluru Win IPL 2025: आरसीबीचा 18 वर्षांचा दुष्काळ संपला, पहिल्यादांच नावावर केली आयपीएल ट्राॅफी; चाहत्यांनी फटाके फोडून साजरा केला आनंद

अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. त्याआधी, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुने पंजाबसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला पंजाबचा संघ 184 धावा करु शकला.

Royal Challengers Bengaluru Win IPL 2025: आरसीबीचा 18 वर्षांचा दुष्काळ संपला, पहिल्यादांच नावावर केली आयपीएल ट्राॅफी; चाहत्यांनी फटाके फोडून साजरा केला आनंद
Photo Credit - X

Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings IPL 2025 Final: आयपीएल 2025 चा अंतिम सामना (IPl 2025) आज म्हणजेच 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) खेळवला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव करत आयपीएल 2025 वर नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. त्याआधी, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुने पंजाबसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला पंजाबचा संघ 184 धावा करु शकला. या शानदार विजयानंतर देशाच्या विविध भागात आरसीबी चाहत्यांनी जल्लोष केला. ज्याचा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2025 12:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).