कर्नाटकात यावर्षी मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. उडुपी जिल्ह्यातील करकला येथील 40 वर्षीय व्यक्तीमध्ये या आजाराची पुष्टी झाली आहे. दुबईत 19 वर्षे काम केल्यानंतर 17 जानेवारीला ही व्यक्ती मंगळुरूला परतली होती. ताप आणि पुरळ आल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची बीएमसी बेंगळुरू येथे चाचणी करण्यात आली आणि पुणेस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने (एनआयव्ही) मंकीपॉक्स आजाराची पुष्टी केली. कर्नाटकच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव हर्ष गुप्ता यांनी सांगितले की, रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. ते म्हणाले की एमपॉक्स हा सौम्य विषाणूजन्य आजार आहे, जो स्वतःच बरे होतो. काळजी करण्यासारखे काहीच नाही. हा आजार खूप जवळच्या आणि घनिष्ठ संपर्काने पसरतो. त्याची संसर्गजन्यता कोरोनासारखी गंभीर नाही. रुग्णाच्या पत्नीसह 20 जण संपर्कात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यांची तपासणी सुरु आहे. (हेही वाचा: Nasal Spray For Depression Treatment: डिप्रेशनच्या उपचारासाठी बाजारात आला नाकावाटे घेतला जाणारा स्प्रे; FDA ने दिली जॉन्सन अँड जॉन्सनच्या Spravato औषधाला मान्यता)

Karnataka Man Tested Positive For Monkeypox:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)