दिवसेंदिवस नैराश्येने त्रस्त असणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. अमेरिकेमध्ये तर अगदी तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक लोक डिप्रेशनचे शिकार झालेले आहेत. मात्र आता नैराश्याने त्रस्त लोकांवर अनुनासिक स्प्रेद्वारे म्हणजेच नाकावाटे घेतल्या जाणाऱ्या स्प्रेद्वारे उपचार शक्य होणार आहेत. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या अन्न आणि औषध विभागाने जॉन्सन अँड जॉन्सनच्या अनुनासिक स्प्रे स्प्रेव्हॅटोला प्रौढांच्या वापरासाठी मान्यता दिली आहे. मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर (MDD) ग्रस्त लोकांसाठी ही मोठी बातमी आहे, कारण एमडीडीवर उपचार करणे खूप कठीण आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनने म्हटले आहे की स्प्राव्हटो नाकाच्या स्प्रेला स्टँड-अलोन थेरपी म्हणून मान्यता देण्यात आली आहे, याचा अर्थ एमडीडी ग्रस्त व्यक्तीला कोणत्याही वेगळ्या औषधाची आवश्यकता नाही. कंपनीचा दावा आहे की, स्प्रेव्हाटो हे उपचार-प्रतिरोधक नैराश्यासाठी नाकावाटे घेतले जाणारे स्वतंत्ररित्या वापरले जाणारे पहिले औषध ठरले आहे. मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर ही नैराश्याची एक स्थिती आहे, जिच्यामध्ये किमान दोन मानक उपचारांनंतरही रूग्णात कोणतीही सुधारणा होत नाही. हे औषध प्रथम 2019 मध्ये अमेरिकेच्या बाजारात आले होते व केवळ तोंडी घेण्याच्या अँटीडिप्रेसंट्ससह वापरण्यासाठी मंजूर करण्यात आले होते. (हेही वाचा: Pune Guillain-Barré Syndrome Cases: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमची 59 प्रकरणे; साथीच्या रोगाचे सर्वेक्षण करण्यासाठी PMC ने तैनात केल्या 100 टीम)
Nasal Spray For Depression Treatment:
The United States Food and Drug Administration (FDA) has approved Spravato (esketamine), a nasal spray from Johnson & Johnson, as a stand-alone therapy for adults with major depressive disorder (MDD) that is difficult to treat, according to a statement by the company.
Read full… pic.twitter.com/HtnZLmkpJy
— Hindustan Times (@htTweets) January 24, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)