रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेतेपद जिंकले आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, RCB ने पंजाब किंग्ज (PBKS) ला 6 धावांनी पराभूत करून आयपीएल 2025 ट्रॉफी जिंकला. शेवटच्या षटकात पंजाबला 29 धावांची आवश्यकता होती आणि RCB चा विजय जवळजवळ निश्चित होताच, मैदानावर एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. 18 वर्षांपासून या विजेतेपदाची वाट पाहत असलेला विराट कोहली अश्रू अनावर झाले. तो मैदानावर रडताना दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा क्षण पाहून चाहतेही भावूक झाले.
The tears say it all 🥹
An 1️⃣8️⃣-year wait comes to an end 👏
Updates ▶ https://t.co/U5zvVhcvdo#TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @imVkohli pic.twitter.com/X15Xdmxb0k
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
