Queen Elizabeth II | (Photo Credit: ANI)

इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या (Queen Elizabeth II) सध्या वैद्यकीय उपाचर घेत आहेत. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे. महाराणी एलिजाबेथ यांच्या आरोग्याबाबत माहिती देताना बकिंगहॅम पॅलेसने (Buckingham Palace) गुरुवारी सांगितले (Queen Elizabeth II Health Update) की, 'त्यांना वैद्यकीय निगराणीखाली राहण्याचा सल्या देण्यात आला आहे. त्यांच्या आरोग्याबाबत डॉक्टरांना चिंता वाटत' असल्याचेही बंकिगहॅम पॅलेसने गुरुवारी सांगितले.

महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या या ऑक्टोबर (2021) महिन्यापासून आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत. वृद्धापकाळाने उद्भवलेल्या आरोग्याच्या तक्रारींमुळे त्यांना चालणे आणि उभा राहणेही कठीण होऊन बसले आहे. प्रिव्ही कौन्सिलची बैठक रद्द केल्याच्या एका दिवसानंतर 96 वर्षीय सम्राज्ञीकडून ही घोषणा झाली. (हेही वाचा, इंग्लंडच्या Queen Elizabeth ला मारण्यासाठी Windsor Castle मध्ये घुसला तरुण; जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेण्याची योजना)

बंकींगहॅम पॅलेस (राणीचा राजवाडा) कडून सांगण्यात आले आहे की, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्या स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसलमध्ये येथे राहात आहेतत. त्यांनी संबंध उन्हाळा येथेच घालवला असल्याचेही राजवाड्याकडून सांगण्यात आले आहे.

ट्विट

राणीच्या राजवाड्याकडून राणीच्या आरोग्याबद्दल दिलेली माहिती अगदीच सामान्य आहे. दरम्यान, वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, राजवाड्याकडून घोषणा होण्यापूर्वी काहीच काळ आगोदर पंतप्रधान लिझ ट्रस आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी संसदेत निरोप पाठविण्यात आला आणि त्यांना त्यांचे दालन सोडण्यास सांगण्यात आले. त्यानंतर तातडीने एक निवेदन जारी करत ब्रिटनच्या नवनिर्वाचीत पंतप्रधान लिझ ट्रस म्हणाल्या की, बंकींगहम पॅलेसमधून आलेल्या वृत्तामुळे अवघा देश चिंतेत आहे.