कोरोना व्हायरस (Coronavirus) या जीवघेण्या विषाणूने सामान्यांपासून उच्चभ्रू लोकांपर्यंत कुणालाही सोडले नाही. आतापर्यंत जगभरातून कलाकार, राजकीय नेते, अशा दिग्गज लोकांनाही कोरोना ची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. यात आता ब्रिटनची राणी एलिझाबेथ 2 (Queen Elizabeth II) यांच्या सहाय्यकाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा बकिंघम पॅलेसचा शाही सहाय्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. 'द सन' या वृत्तपत्राने दिलेल्या ही माहिती दिली असून या पॅलेसमध्ये 500 लोक काम करतात. त्यामुळे त्यांना सर्वांना Quarantine करण्यात आले आहे. तसेच ब्रिटनची राणी एलिझाबेथ 2 यांना देखील विंडसर पॅलेसमध्ये Quarantine करण्यात आले आहे.
'द सन' या वृत्तपत्रातून असे सांगण्यात येत आहे की, 'बकिंघम पॅलेसमध्ये जवळपास 500 लोक काम करतात. त्यामुळे ही संख्या खूप जास्त असून या लोकांची देखील कोरोना चाचणी करण्यात येत आहे.' तसेच या सहाय्यकाच्या संपर्कात अजून कोण कोण आले याचाही शोध घेण्यात येत आहे. Coronavirus Outbreak: US सेनेटर रैंड पॉल COVID-19 पॉझिटीव्ह तर जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांनी घेतला होम क्वारंटाईन चा निर्णय
मुख्य गोष्ट म्हणजे कोरोनाची लागण झालेला सहाय्यक हा राणी एलिझाबेथ यांच्या संपर्कात आला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या जगभरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 3 लाखांच्या वर गेला असून यात 14,654 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. या मृतांपैकी 5,476 लोक हे इटलीतील आहे. इटलीसाठी हा खूपच चिंताजनक विषय असून सर्व शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर यावर काही ठोस उपाय शोधता यावा यासाठी जगभरातील तज्ज्ञांची टीम कामाला लागली आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे मागील अवघ्या 24 तासात अमेरिकेत तब्बल 100 हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागल्याचे धक्कादायक आकडेवारी सध्या समोर येत आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिकेचे नाव तिसऱ्या स्थानी आहे, चीन मधील ही परिस्थिती आता 80 टक्के सुधारल्याने इटली (Italy) या यादीत पहिल्या स्थानी असणारा देश आहे. वॉशिंग्टन (Washington) आणि न्यूयॉर्क (New York) मध्ये मृतांचे प्रमाण अधिक असून याच भागात कोरोनाच्या फैलावाची सुरुवात झाली होती