कश्मीर मध्ये सॅटेलाईटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा देणार असल्याच्या दाव्यावर पाकिस्तानची खिल्ली
Satellite (Photo Credits-File Image)

जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधून कलम 370 हटवल्यानंतर संतापलेल्या पाकिस्तानच्या (Pakistan) कुरापती अद्याप सुरुच आहेत. त्यानंतर आता पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी कश्मीर मध्ये सॅटेलाईटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा देणार असल्याचा दावा केला आहे. या दाव्यावर आता त्यांची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.

पाकिस्तानचे विज्ञान आणि प्रौद्योगिक मंत्री फवाद हुसैन यांनी गुरुवारी एक विधानात त्यांनी त्यांच्या आंतराळ कंपनीचे नाव चुकीचे घेतल्याने पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. खरंतर फवाद हुसैन यांनी ट्वीट करत त्यात असे म्हटले, पाकिस्तानकडून सॅटेलाईटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवली जाणार आहे. यासाठी काम सुद्धा सुरु करण्यात आले आहे. तसेच देशातील नागरिकांना इंटरनेट हे सध्या मुलभूत अधिकार असल्याचे वाटते. मात्र जम्मू-कश्मीर मध्ये ही सुविधा नाही आहे. त्यामुळे मी SPRAO यांनी कश्मीर मध्ये सॅटेलाईटच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरवण्याबाबत विचारले असल्याचे हुसैन यांनी म्हटले आहे.

फवाद हुसैन यांच्या या विधानांमुळे त्यांना ट्रोल करण्यात आले आहेच. पण त्यांच्या अंतराळ कंपनीचे नाव SUPARACO असून त्यांनी ट्वीटमध्ये SPRACO असे लिहिले. या प्रकारामुळे एका युजर्सने असे म्हटले की, बलूचिस्तान येथे गेल्या दीड महिन्यापासूनच इंटरनेट सुविधा पुरवली जात नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या देशाचे पहा त्यानंतर दुसऱ्यांचे पहा.(गिफ्ट म्हणून कोट्यावधी रुपये मिळाल्याने 24 वर्षांचा तरुण रातोरात झाला अब्जाधीश; डोनाल्ड ट्रंपपेक्षाही जास्त आहे संपती)

यापूर्वी सुद्धा पाकिस्तानच्या मंत्र्यांनी आम्ही सुद्धा आंतराळात आमचा माणूस पाठवणार असल्याचे सांगितले होते. तसेच त्यासाठी निवडप्रक्रिया सुद्धा होणार होती. या विधानावरुन सुद्धा पाकिस्तानची जबरदस्त खिल्ली सोशल मीडियात उडवण्यात आली होती.