पाकिस्तान (Pakistan) मधून एक मोठे वृत्त समोर येत आहे,पाकिस्तान च्या शेखुपुरा (Sheikhupuru) भागात ट्रेन आणि मिनी बसमध्ये जोरदार धडक झाली (Accident) असून या अपघातात 19 शीख भाविकांचा (Sikh Pilgrims) मृत्यू झाला आहे. वृत्त संस्था ANI ने दिलेल्या माहितीनुसार 8 शीख भाविक जखमी झाले आहेत. हा अपघात ननकाना साहिबजवळील (Nankana Sahib) फाटक नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर झाला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्वांना लगतच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. PM Narendra Modi Leh Visit: विस्तारवादामुळे जगाचं मोठं नुकसान, आता विकासयुग सुरू झालंयं; PM नरेंद्र मोदी यांनी वाढवलं भारतीय जवानांचं मनोधैर्य
पाकिस्तानी मीडिया च्या माहितीनुसार, शाह हुसैन एक्सप्रेस ट्रेन (Shah Hussain Express train) आणि एका मिनी बस मध्ये आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान यांनी सुद्धा या दुर्घटनेनंतर ट्विट करून खेद व्यक्त केला.
ANI ट्विट
A bus carrying Sikh pilgrims was hit by a train in Sheikhupura district in Pakistan's Punjab, 19 passengers killed, 8 injured: Local media pic.twitter.com/udx1E5Aqv7
— ANI (@ANI) July 3, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट
Pained by the tragic demise of Sikh pilgrims in Pakistan. My thoughts are with their families and friends in this hour of grief.
I pray that those pilgrims injured recover at the earliest.
— Narendra Modi (@narendramodi) July 3, 2020
दरम्यान, दुर्घटनेच्या नंतर विभागीय इंजीनियरला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. पाकिस्तान चे रेल्वे मंत्री शेख राशिद (Sheikh Rashid) यांनी सुद्धा अन्य दोषींचा तपास करून लगेचच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.