Pakistan Shocker: 13 वर्षांच्या मुलीशी लग्न केल्याप्रकरणी 70 वर्षीय वृद्धाला अटक; पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा येथील घटना
Marriage | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Pakistan Shocker: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील(Khyber Pakhtunkhwa) स्वातमध्ये, पोलिसांनी एका 70 वर्षीय व्यक्तीला एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी लग्न (Child Marriage) केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. हे कृत्य बेकायदेशीर आणि गंभीर मानले गेले आहे. एआरवाय न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे लग्न तिच्या वडिलांनी वृद्ध व्यक्तीसोबत लावले होते. ही माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत वृद्धाला आणि मुलीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली. (हेही वाचा:Pakistan Shocker: रक्षक नव्हे राक्षस! पोलीस कर्मचाऱ्याकडून ट्रान्सजेंडरवर बलात्कार; पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील घटना )

शिवाय, विवाह सोहळ्यातील उपस्थितांनाही ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलीची स्थानिक रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ही घटना बालविवाहाचे सततचे आव्हान अधोरेखित करत आहे. जे की केवळ संविधानात दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत नाही तर तरुण मुलींच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करते.

पाकिस्तानच्या विद्यमान कायद्यानुसार, 1929 च्या कालबाह्य विवाह प्रतिबंध कायद्यानुसार मुलींसाठी 16 आणि मुलांसाठी 18 वर्षे विवाहाचे किमान वय पाकिस्तानमध्ये निर्धारित केले गेले आहे. तथापि, विवाहाचे किमान वय १८ पर्यंत वाढवण्याच्या प्रयत्न सुरू आहे. विशेषत: खैबर पख्तुनख्वामधील पुराणमतवादी गटाचा याला विरोध आहे.