Pakistan Shocker: रक्षक नव्हे राक्षस! पोलीस कर्मचाऱ्याकडून ट्रान्सजेंडरवर बलात्कार; पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील घटना
Photo Credit -X

Pakistan Shocker: पाकिस्तानमधील पंजाब(Panjab) प्रांतातील गुजरात शहरात पोलिसाने ट्रान्सजेंडरवर बलात्कार(Transgender Rape)केल्याची घटना उघडकीस आली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी तीन ट्रान्सजेंडरसह चार जणांना अटक केली होती. रस्त्यावरील सिग्नलवर थांबून वाद घातल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली होती. हिरा असे पिडीत ट्रान्सजेंडरचे नाव आहे. ती तिच्या साथीदारासोबत असताना त्यांचा पोलिसांसोबत वाद झाला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. जिथे त्यांच्यावर बलात्कार (Rape Case) झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा:Human Life Span: चिनी शास्त्रज्ञांनी शोधला वृद्धत्व थांबवण्याचा उपाय; आता 130 वर्षे आरामात जगू शकतो मानव, जाणून घ्या सविस्तर)

पोलीस स्टेशनमध्ये हिरासोबत बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ट्रान्सजेंडर समुदायाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. पोलीस स्टेशन दगडफेक करण्यात आली. तेथील सामानाची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे पोलिस स्टेशनमधील अनेक गोष्टींचे मोठे नुकसान झाले. पोलीस स्टेशमनधील फर्निचरचा काही भाग रस्त्यावर फेकला गेला असे, घटनेतील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिकारी (डीपीओ) सय्यद असद मुझफ्फर यांनी त्वरित कारवाई सुरू केली. त्यांनी एसपी इन्व्हेस्टिगेशनच्या नेतृत्वाखाली संपूर्ण घटनेचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर, चौकशी समितीच्या निष्कर्षांच्या आधारे आणि कायद्याच्या विविध कलमांनुसार 20 व्यक्तींसह 27 ट्रान्सजेंडर्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याव्यतिरिक्त, ट्रान्सजेंडर हिरा यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर एक वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती एआरवाय न्यूजने दिली आहे.