Human Life Span: चिनी शास्त्रज्ञांनी शोधला वृद्धत्व थांबवण्याचा उपाय; आता 130 वर्षे आरामात जगू शकतो मानव, जाणून घ्या सविस्तर
Human Life Span (Photo Credit : Pixaby)

जास्तीत जास्त काळ जगता यावे अशी जवळजवळ प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र हे सहजा सहजी शक्य नाही. दुसरीकडे शास्त्रज्ञ देखील मानवाचे आयुर्मान (Human Life Span) वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या मालिकेत सध्या चिनी शास्त्रज्ञांना (Chinese Scientists) मोठे यश मिळाले आहे. त्यांनी आयुर्मान वाढवण्यासाठी उंदरांवर प्रयोग केले व जे यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर त्यांचा प्रयोग मानवांवर यशस्वी झाला तर मानवी आयुष्य 130 वर्षांपर्यंत वाढले जाऊ शकते.

नेचर एजिंग जर्नल या इंग्रजी वेबसाइटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चिनी वैज्ञानिकांनी सर्वप्रथम उंदरांवर अँटी-एजिंग चाचणी केली. त्यांनी दर आठवड्याला 20 महिन्यांच्या उंदराला वृद्धत्वविरोधी इंजेक्शन्स दिली. त्यामुळे उंदरांचे व आहे त्यापेक्षा कमी दिसू लागले, म्हणजेच त्यांचे म्हातारपण थांबले. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या वायोर्मानात 2.7 टक्क्यांनी वाढ झाली. हा एक विक्रम आहे.

या संशोधन टीमचे सदस्य झांग चेन्यु म्हणाले की, या प्रयोगाचे निकाल समोर आल्यानंतर, आम्हाला हे पाहून आनंद झाला की, जिथे एक सामान्य उंदीर फक्त 840 दिवस जगतो, तिथे आमचे हे इंजेक्शन घेतलेले अनेक उंदीर 1266 दिवस जिवंत राहिले. आम्हाला विश्वास आहे की, जर हे इंजेक्शन मानवांना दिले तर त्यांचे आयुष्य 120 ते 130 वर्षे असू शकते. झांग चेन्यु पुढे म्हणाले, जर त्यांचे इंजेक्शन मानवांना देण्याची परवानगी दिली, तर मानवाचे आयुर्मान वाढेल याची खात्री बाळगा. (हेही वाचा: Bharat Biotech on Covaxin's Side Effects: 'कोवॅक्सिन लस पूर्णपणे सुरक्षित, कोणतेही दुष्परिणाम नाहीत', भारत बायोटेकचे निवेदन)

हे अँटी-एजिंग केमिकल औषधांद्वारे दिले जाऊ शकते. यासाठी रक्त बदलण्याची गरज भासणार नाही. महत्वाचे म्हणजे ते मानवी शरीरात प्रवेश करताच भविष्यात त्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही. या संशोधनाचे लेखक चेन शी यांनी सांगितले की, उंदरांवरील प्रयोगासाठी त्यांच्या टीमने सात वर्षे मेहनत घेतली आहे. त्यांनी अनेक उंदरांवर वेगवेगळ्या प्रकारे त्याची चाचणी केली आहे, ज्याचे फक्त सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. आता त्यांना आशा आहे की त्याचे परिणाम मानवांवर देखील सकारात्मक होतील.