इम्रान खान (Photo Credit : Youtube)

दहशतवादी संघटनांना थारा देणारा पाकिस्तान (Pakistan) आज जगात चेष्टेचा विषय बनला आहे. स्वतःच्या देशाच्या विकासाऐवजी शेजारील राष्ट्रावर हल्ले करण्यात धन्यता मानणाऱ्या पाकिस्तानची वाटचाल दारिद्र्यतेकडे होत असलेली दिसून येत आहे. नुकेतच गरिबीमुळे पाकिस्तानी नागरिकांनी दोन ऐवजी एकच चपाती खावी, असे वक्त्यव्य विधानसभा प्रवक्ता मुस्ताक गानी यांनी केले होते.  आता पाकिस्तानमध्ये खाण्या पिण्याच्या मुलभूत गोष्टींच्या किंमतीही आकाशाला भिडल्या आहेत. त्यात कराची डेअरी फार्म असोशिएशनने (Dairy Farm Association) बुधवारी दुधाचा भाव तब्बल 23 रुपये प्रति लिटरने वाढवला. त्यामुळे पाकिस्तानमधील दुधाचे दर 120 रुपये प्रति लीटर इतके झाले आहेत. रिटेलमधील बाजार भावानुसार तर दुधाचे दर 180 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहचले आहेत.

याआधी असोशिएशनने सरकारकडे दुधाच्या दरात वाढ करण्याची मागणी केली होती, मात्र सरकारने याकडे लक्ष न दिल्याने असोशिएशनने स्वतःच ही दरवाढ केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला शेतमालाचा पुरवठा बंद केला होता. त्यावेळी पाकिस्तानमध्ये टोमॅटोचे दर 200 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले होते. त्याच सोबत इतर भाज्यांच्या दरांमध्येही कमालीची वाढ झाली आहे. सध्या पाकिस्तानमध्ये महागाईचा दर 9.41 टक्क्यांवर पोहचला आहे. (हेही वाचा: दोन ऐवजी एक चपाती खा- इम्रान खान सरकारचा सल्ला)

शिक्षणाचा अभाव, सामाजिकदृष्ट्या मागासलेला समाज, वाढती बेरोजगारी, दहशतवाद्यांची वाढती संख्या यांमुळे गेल्या 70 वर्षांत पाकिस्तानचा विकास झालाच नाही. यामुळे जनतेच्या गरजांसाठी घेतलेल्या कर्जाचा बोझा वाढत गेला. पाकिस्तानच्या अशा परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पाकिस्तानी रुपयाचे मूल्य कमालीचे घसरून, एका डॉलरची किंमत 140 पाकिस्तानी रुपयांवर गेली आहे. पाकिस्तानच्या अशा परिस्थितीमुळे सौदीकडून पाकिस्तानला 20 बिलीयन डॉलरची मदत करण्यात आली आहे. मात्र या मदतीचा कितपत आणि कसा फायदा झाला हे सध्याची महागाई पाहून लक्षात येते.