 
                                                                 पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबगाईला आली असून इम्रान खान सरकार सध्या चिंतेत आहे. त्यातच वाढती महागाई आणि आर्थिक तोट्यामुळे अर्थव्यवस्थेची कंबर अधिकच मोडली आहे. त्यामुळे पैसे जोडण्यासाठी सरकारकडून विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. यातच पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) विधानसभेचे प्रवक्ता मुस्ताक गानी (Mushtaq Ghani)यांनी केलेले विधान चर्चेचा विषय ठरत आहे. 'मीट द प्रेस' या कार्यक्रमात ते म्हणाले की, "पाकिस्तानी नागरिकांनी दोन ऐवजी एकच चपाती खावी." त्यांनी दिलेला हा सल्ला सध्या खूप चर्चेत आहे.
ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे पाकिस्तानवर जगभरातील देशातून मदत मागण्याची वेळ आली आहे. साऊथ अरबचे प्रिंस मोहम्मद बिन सलमान (Saudi crown prince Mohammad Bin Salman) यांनी पाकिस्तानला दान दिले आहे. साऊथ अरब आणि पाकिस्तान दरम्यान रविवारी 20 बिलियन डॉलरच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारात रिफाईनिंग, पेट्रोकेमिकल क्षेत्रातील गुंतवणूक संधी, खेळातील सहयोग, सौदी मालाच्या आयात-निर्यातीवर सामंजस्य, वीज उत्पादन इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला होता. ज्यानुसार पाकिस्तानात सुमारे सव्वा दोन करोड मुलांना शिक्षणाची इच्छा असूनही शिक्षण घेता येत नसल्याचे उघड झाले आहे. यात अधिकतर मुलींची संख्या आहे. हा रिपोर्ट एका आंतरराष्ट्रीय अधिकार समूह ह्युमन राईट वॉचने तयार केलेला आहे. "मैं अपनी बेटी को भोजन दूं या उसे पढ़ाऊं; पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणात अडथळा," या नावाने हा रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. सुमारे 32% मुली प्राथमिक शिक्षण घेऊ शकत नाही. यात मुलांचे प्रमाण 21% आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
