Air Strikes On Afghanistan: अफगाणिस्तानात घुसून पाकिस्तानचे एयर स्ट्राइक; टीटीपीच्या दहशतवादी संघटनेच्या तळांना केले लक्ष्य
Air Strike प्रतिकात्मक प्रतिमा (PC _ Pixabay)

Air Strikes On Afghanistan: दोन दिवसांपूर्वी पाकिस्तान (Pakistan) च्या लष्करी चौकीवर झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी आता पाकिस्तानने कडक कारवाई केली आहे. पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तान (Afghanistan) मधील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष्य केले आहे.

पाकिस्तानचा अफगाणिस्तानात हवाई हल्ला -

पाकिस्तानच्या दोन सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी अफगाणिस्तानमध्ये असलेल्या पाकिस्तानी तालिबान संघटनेच्या अनेक तळांवर हवाई हल्ले (Air Strikes) करण्यात आले. याप्रकरणी पाकिस्तानी लष्कराकडून कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आले नसले तरी तालिबान सरकारने अफगाणिस्तानमधील हवाई हल्ल्यांचा निषेध केला आहे. ( हेही वाचा -  Attack on Pakistan Military Post: पाकिस्तानी लष्करी चौकीवर हल्ला, सुरक्षा दलाचे 5 जवान ठार)

हवाई हल्ल्यात आठ जण ठार -

त्याचवेळी पाकिस्तानी तालिबान संघटनेने एक निवेदन जारी करून हवाई हल्ल्याला दुजोरा दिला आहे. बरमाल जिल्ह्यात पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात तीन महिला आणि तीन मुले ठार झाली, तर खोस्त प्रांतात झालेल्या हल्ल्यात अन्य दोन महिला ठार झाल्या, असे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

आत्मघातकी हल्ल्यात सात जवान शहीद -

दोन दिवसांपूर्वी उत्तर-पश्चिम पाकिस्तानात असलेल्या एका लष्करी चौकीला दहशतवादी संघटनेने लक्ष्य केले होते. पाकिस्तानच्या वायव्य भागात एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेला ट्रक एका लष्करी चौकीवर धडकला. या हल्ल्यात सात जवान शहीद झाले होते.