blast| Image only representative purpose (Photo Credits: Pxhere)

Oil Tanker Explosion: अफ्रिकेतील सिएरा लियोनची राजधानी फ्रीटाउनमध्ये एक फ्यूल टँकरचा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत 92 जणांचा बळी गेला आहे. सिएरा लियोनच्या नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट एजेंसीचे कम्युनिकेशन डायरेक्टर मोहम्मद लमराने बाह यांनी म्हटले की, स्फोटात लोक जखमी सुद्धा झाले असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर रुपात जखमींमुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण झालेले आहे.

सिएरा लियोनचे राष्ट्राध्यक्ष जूलियस माडा बायो यांनी दुर्घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करत असे म्हटले की, स्फोट आणि मृतांची बातमी ऐकून वेदना होत आहेत. तर सरकार कडून पीडितांच्या परिवाराला मदत केली जाईल. तर फ्रीटाउनच्या महापौर यवोन अकी-सॉयर यांनी दुर्घटनेप्रकरणी फेसबुकवर विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, वेलिंगटनच्या बाई ब्यूरेह रोडवरील स्फोटामुळे धक्का बसला आहे. तेल घेऊन जाणाऱ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने जोरदार स्फोट झाला.(US: म्युजिक फेस्टिव्हलमध्ये स्टेजच्या जवळ जाण्यासाठी प्रेक्षकांची एकमेकांना धक्काबुक्की, 8 जणांचा मृत्यू)

Tweet:

तेलाच्या टँकरचा स्फोट झाल्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. अकी-सॉयर यांनी म्हटले की, ही अत्यंत दु:खद घटना आहे. माझ्या वेदना या स्फोटात मृत्यू झालेल्या पीडितांच्या परिवारासह असतील. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो.