'हाऊडी मोदी' (Howdy Modi) या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दहशतवादाच्या विरोधात आवाज उठवला आहे. तसेच दहशतवादाविरोधातील लढाईत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) भारतासोबत (India) आहेत. भारतात जे दहशतवादी हल्ले झाले आहेत, हे हल्ले कोणत्या देशाने केले आहेत, याची सर्वांना माहिती आहे. यापुढे पाकिस्तान (Pakistan) दहशतवादी कृत्य करेल तर त्याचे परिणाम वाईट होतील, असे सांगत नाव न घेता मोदींनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहे. त्याचबरोबर आपल्या देशात होणारा बदल काही लोकांना दिसत नाही, असे बोलत मोदींनी विरोधकांवरही जोरदार टिका केली आहे.
नरेंद्र मोदी यांचे एनआरजी स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले होते. अमेरिकेतील रहिवासी भारतीयांना संबोधित करताना मराठीसह विविध भाषेत मोदींनी भारतात सर्व काही ठिक सुरु आहे, असे सांगितले. या दरम्यान, भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्या पाकिस्तानवर मोदींनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. काही लोकांना आपला देश सांभाळता येत नाही. पण ते भारताच्या अंतर्गत मुद्यावर भाष्य करत आहेत. राजकारणासाठी ही मंडळी दहशतवाद्यांना पोसत आहेत, असे म्हणत मोदींनी पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली. तसेच यापुढे भारतात दहशतवादी कृत्य कराल, तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. या दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत आहे, असे मोदीं म्हणाले. त्याचबरोबर 'सबका साथ सबका विकास' हा भारताचा मंत्र असून 'नवा भारत' हा देशाचा संकल्प आहे. देश बदलत आहे पण काही लोकांना ते दिसत नाही, असे सांगत मोदींनी विरोधकांवरही टीकास्त्र सोडले आहे. या कार्यक्रम दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनीही दहशतवाद्यांच्या विरोधात त्यांची भुमिका स्पष्ट केली. अमेरिका देश इस्लामिक दहशतवादांच्या विरोधात ठाम पणे उभा आहे, असे ते म्हणाले. हे देखील वाचा-Howdy Modi: भारत-अमेरिका यांच्यामधील नाते एका नव्या स्तरावर पोहचणार, जाणून घ्या 'हाउडी मोदी' कार्यक्रमाचे खास मुद्दे
जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद 370 समानतेच्या विरोधात होता. अनुच्छेद 370 हटवून भारताने या प्रदेशात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अनुच्छेद 370 ला आम्ही फेअरवेल दिले. त्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखमधील जनतेच्या विकासाचे दरवाजे उघडले गेले आहेत. या प्रदेशातील जनतेवर होणारा भेदभाव नष्ट करण्याचे मोठे काम सरकारने केले आहे. राज्यसभेत बहुमत नसताना देखील अनुच्छेद 370 हद्दपार करण्यात यश मिळाले आहे.