आई होती पार्टी करण्यात मश्गुल, भुकेने व्याकूळ झालेल्या चिमुकल्याने पाळण्यातच सोडला जीव, रशियातील हृदय पिळवटून टाकणारी घटना
Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

देव सगळीकडे राहू शकत नाही म्हणून त्याला आईस्वरुपी देवाला धरतीवर पाठवले. मात्र हिच आई आपल्या पोटच्या लेकरांच्या जीवावर उठल्याचे ऐकले तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र अशी घटना घडली आहे रशियामध्ये.... आईच्या निष्काळजीपणामुळे एका 11 महिन्यांच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. मिरर या वेबसाइटच्या वृत्तानुसार, मित्रांसह दारू पार्टी करण्यासाठी निर्दयी महिलेने 11 महिन्यांचा बाळाला आणि तीन वर्षाचा मुलीला घरात एका खोलीत बंद केले. चार दिवसांपासून भुकेने व्याकूळ असलेल्या मुलाचा अखेर पाळण्यातचं मृत्यू झाला, तर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रशियाच्या झ्लाटॉस्टमधील ही घटना आहे. जेथे 25 वर्षीय ओल्गा बजरोवाने आपल्या मित्रांसह पार्टी करायची म्हणून आपल्या दोन चिमुकल्यांना घरात बंद करुन पार्टीला गेली. चार दिवस ही दोन्ही मुलं घरात बंद होते. दरम्यान ओल्गाने स्वत:हून आपल्या मुलांबाबत कोणतीही माहिती घेतली नाही.हेदेखील वाचा- Solapur: सोलापूर येथील धक्कादायक घटना; घशात साबुदाणा अडकल्याने एका अल्पवयीन मुलाचा गुदमरून मृत्यू

जेव्हा ती पार्टी करून घरी परत आली तेव्हा तिचा 11 महिन्यांचा मुलगा भूक आणि तहानने मरण पावला, तर तीन वर्षांची मुलगीही खूपच थकलेली आणि भयभीत होती. घरी जाताना ओल्गाने मुलांच्या आजीशी संपर्क साधला होता. मुलांची आजी जेव्हा घरी पोहचली तेव्हा तिने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ओल्गाला अटक केली, तर मुलीला रुग्णालयात दाखल केले. या घटनेने क्रूरतेचा कळस गाठला असून तेथील पोलिस याचा तपास घेत आहेत.