घशात साबुदाणा अडकल्याने एका 11 वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या माढा (Madha) तालुक्यातील वडाची वाडी (Wadachiwadi) येथे गुरुवारी (11 मार्च) घडली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीच ही घटना घडली असून संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा जेवत असताना त्याच्या घशात साबुदाणा अडकला होता. त्यानंतर श्वासोच्छवास घेण्यास अडथळा येऊ लागल्याने त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्देवाने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे.
रोहन सिद्धेश्वर निळे (वय, 11) असे मृत मुलाचे नाव आहे. रोहन हा माढा तालुक्यातील वडाची वाडी येथे राहायला होता. रोहन हा दिव्यांग असून महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांच्या घरात साबुदाणा बनवला होता. त्याने दुपारी चारच्या सुमारास साबुदाणा खाल्ला होता. त्यानंतर काही वेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागले. तसेच श्वासोच्छवास घेण्यात त्याला अडचणी येऊ लागल्या. ज्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला माढ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपाचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात न्यूज 18 लोकमतने दिली आहे. हे देखील वाचा- Rekha Jare Murder Case: मुख्य सूत्रधार बाळ बोठे ला हैदराबाद मधून 3 महिन्यांनी अटक
रोहन केवळ 11 वर्षाचा असल्याने निळे कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अस्कमित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.