
Mumbai Crime News: मुंबईजवळील (Mumbai) मानखुर्द परिसरात शनिवारी वडिलांनी आपल्या मुलाची हत्या (Murder) केली आहे. या घटनेप्रकरणी आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक (Arrest) केले आहे. इम्राम अन्सारी असं आरोपीचे नाव आहे. तो मानखुर्द येथील मंडाळा येथील रहिवासी आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.(हेही वाचा- बोरिवलीत रस्ता ओलांडताना वेगवान कारच्या धडकेत 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, चालकाला अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द येथे वडिलांनी आपल्या 1.5 वर्षाच्या मुलाची हत्या केली होती. अफना असं हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. अफान लहानपणापासून आजारी होता. त्याला किडनीचा त्रास होत असल्याने तो नेहमीच वेदनेने रडत असायचा. त्यांच्या वडिलांनी आजारपणासाठी भरपूर खर्च केला होता. अन्सारी आणि त्याची पत्नी सकिना आणि त्यांचा मुलगा अफान हे तिघे ही राहत होते. अफानच्या किडनी त्रासाला कंटाळून वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.
अफान आणि इम्रान घरी होते. शनिवारी तो वेदनाने रडत होता. त्यावेळी सकीना घरी नव्हती. जेव्हा सकिना घरी परतली त्यावेळीस अफान निपचित पडून होता. त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. तो बराच वेळ बेशुध्द अवस्थेत असल्याचे सकीनाला समजले त्यामुळे तीने धावतपळत अफानला जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासले आणि त्याला मृत घोषित केले. अफानच्या डोक्यावर मागील बाजूस जखम आढळले. डॉक्टरांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस रुग्णालयात दाखल होताच त्यांनी चौकशी सुरु केली.
इम्रानची चौकशी केली तेव्हा सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी कंबर कसून त्याची चौकशी केल्यानंतर इम्रानने त्याच्या गुन्ह्याची कबुली केली. पुढे पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाख केला करून त्याला अटक केली आणि पुढील कारवाई सुरु केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.