Abhijeet Banerjee यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं; Microsoft च्या Bill Gates यांचे कौतुकोद्गार
Bill Gates Abhijeet Banerjee | (Pic Courtesy: Filed Image)

मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी शनिवारी भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी (Abhijeet Banerjee) यांचे कौतुक करत बॅनर्जी यांना अर्थशास्त्रासाठी मिळालेल्या नोबल पारितोषिकाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. काही दिवसांपूर्वीच बॅनर्जी, त्यांची पत्नी इस्थर डफ्लो आणि मायकेल क्रीमर यांना संयुक्तपणे या वर्षीचा अर्थशास्त्राचा नोबल जाहीर झाला होता.

गेट्स यांनी ट्विटरवर सर्व विजेत्यांचं अभिनंदन करतानाच त्यांच्या कामातून आपल्याला जगातील सर्व गरीब लोकांच्या आयुष्यात असणाऱ्या गुंतागुंतीबद्दल बरंच काही शिकायला मिळालं असल्याचंही सांगितलं. बॅनर्जी, डफ्लो आणि क्रीमर यांना गरिबी उत्थापनाच्या प्रायोगिक दृष्टीकोनासाठी पारितोषिक मिळाले होते.

यावर्षीच्या लॉरिएटसने केलेल्या संशोधनामुळे जागतिक गरिबीशी लढा देण्याच्या आपल्या क्षमतेत वाढ सुधारणा झाली आहे. फक्त दोन दशकांतच त्यांच्या प्रयोगावर आधारित पद्धतीमुळे 'विकासाचे अर्थशास्त्र' बदलले आहे, ज्यात आता संशोधनाच्या भरभराटीला वाव आहे,' असे विधान शनिवारी नोबल कमिटीने केले. (हेही वाचा. Nobel Prize 2019 Economics Winners: भारतीय वंशाच्या अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर)

बॅनर्जी यांनी आपल्या संशोधनामध्ये सरकारी योजना किती क्रियाशीलतेने पार पाडल्या जातात याचा अभ्यास केला आहे. राजस्थान मधील एका भागात पोलिओ उच्चटनासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचा अभ्यास करताना असे लक्षात आले की कित्येक माता आपल्या मुलांना लसीकरणासाठी केंद्रांवर घेऊन जात नाहीत. परंतु तेच जेव्हा त्यांच्या कडे सर्व लसींची एक थैली घरपोच देण्यात आली तेव्हा त्या भागातील लसीकरणाचा दर कमालीने वाढला. तसेच मुलांच्या शैक्षणिक विकासाबाबत अभ्यास करताना त्यांनी मुलांच्या विकासाचा शाळांच्या स्थितींशी सॅम प्रमाणात संबंध असल्याचंही प्रतिपादन केलं होतं.