Love Story: बिझनेस टायकूनच्या मुलीने प्रियकराशी लग्न करण्यासाठी सोडली 2,484 कोटी रुपयांची संपत्ती, जाणून घ्या सविस्तर
Angeline Francis (संग्रहित संपादित प्रतिमा)

जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात असते तेव्हा ती आपल्या प्रेमासाठी जगातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यास तयार होते. प्रेमासाठी जोडप्यांनी आपल्या कुटुंबाविरुद्ध बंड करण्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. काही वर्षांपूर्वी एका मलेशियन एका अब्जाधीश महिलेनेही असेच केले होते. ही घटना जुनी असली तरी, सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकहाणीमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

तर, मलेशियामध्ये खू के पेंग (Khoo Kay Peng) नावाच्या उद्योगपतीची एक मुलगी होती, जिथे नाव अँजेलिना फ्रान्सिस खू (Angeline Francis Khoo) असे होते. तिची आई पॉलीन चाय ही माजी मिस मलेशिया होती. के पेंग हे मलेशियन युनायटेड इंडस्ट्रीजचे मालक होते. त्यांची इतरही अनेक उद्योगांमध्ये गुंतवणूक होती. अँजेलिनाच्या वडिलांची एकूण संपत्ती 300 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2,484 हजार कोटी होती. पण अँजेलिनाच्या आयुष्यात असे काही घडले की तिने तिच्या वडिलांच्या अब्जावधीच्या संपत्तीवर पाणी सोडले. यामुळेच ती प्रसिद्धीच्या झोतात आली.

अँजेलिना 2001 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेली. त्या वेळी, तिची भेट कॅरिबियन डेटा शास्त्रज्ञ जेदिडिया फ्रान्सिस याच्याशी झाली. ती फ्रान्सिसच्या प्रेमात पडली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र अँजेलिनाचे वडील यामुळे नाराज झाले. त्यांना आपल्या मुलीसाठी फ्रान्सिसचे स्थळ योग्य वाटले नाही व त्यांनी या लग्नास नकार दिला. अँजेलिनाला याचा प्रचंड राग आला आणि ती वडिलांची संपूर्ण मालमत्ता सोडून फ्रान्सिसशी लग्न करण्यासाठी गेली. पुढे 2008-09 मध्ये दोघांनी लग्न केले. (हेही वाचा: Shocking Rule by Taliban: अफगाणिस्तानमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींना शाळेत जाण्यास बंदी; तालिबानचे नवे फर्मान, विद्यार्थिनींना तिसरीनंतर सोडावे लागणार शिक्षण)

त्यानंतर तिने 2015 मध्ये 'रोजी ऑन फायर' नावाचा लक्झरी कपड्यांचा ब्रँड सुरू केला. फ्रान्सिसने आणि तिच्या आईने तिला यासाठी मदत केली. पण त्याआधी 2013 मध्ये तिच्या आई-वडिलांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. चार वर्षानंतर त्यांना घटस्फोट मंजूर झाला. सध्या अँजेलिना तिच्या व्यवसायावर काम करत आहे.