Microsoft संस्थापक Bill Gates यांनी सांगीतली आयुष्याती सर्वात Greatest Mistake; ज्याचा त्यांना होतो पश्चाताप
Bill Gates | (Photo Credits: Twitter)

मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीचे को फाऊंडर बिल गेट्स (Bill Gates) यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक जाहीरपणे सांगीतली आहे. अँड्रॉइड परेटींग सिस्टम (Android Operating System) विकसित करण्याची संधी गूगला देणे ही आपल्या आयुष्यातील मोठी चूक होती असे बिल गेट्स यांनी म्हटले आहे. अँड्रॉइड (Android) कंपनी खरेदी न करणे ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे बिल गेट्स यांना वाटते. तसेच, या गोष्टीचा त्यांना सतत पश्चाताप होतो असेही ते म्हणतात.

दरम्यान, मायक्रोसॉफ्ट कंपनीची मार्केटमध्ये आजही दमदार ओळख आहे. मात्र, गूगल अँड्रॉइड (Google Android) सिस्टमबद्दल ज्या पद्धतीने व्यवस्थापन करुन पावले टाकत आहे ती सुरवातीलाच ओळखली असती तर, मायक्रोसॉफ्ट ही सध्या जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली असती असेही बिल गेट्स यांनी म्हटले आहे. Early Stage Venture Capital Firm Village Global च्या एका कार्यक्रामात गेट्स यांनी हे मनोगत व्यक्त केले आहे.

बिल गेट्स यांनी म्हटले आहे की, 'सॉफ्टवेअर च्या जगतातील खास करुन मोबाईल प्लॅटफॉर्म मध्ये विजेताच बाजारपेठेवर राज्य करतो. माझी सर्वात मोठी चूक हीच की त्या वेळी मी या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने हाताळू शकलो नाही. म्हणूनच मायक्रोसॉफ्ट आज त्या उंचीवर नाही ज्या उंचीवर अँड्रॉइड आहे.' गेट्स यानी पुढे म्हटले आहे की, 'अॅपल शिवाय त्या वेळी मार्केटमध्ये केवळ एकाच ऑपरेटींग सिस्टमला स्कोप होता. त्या एका ऑपरेटीं सिंस्टमची जागा गूगलने अत्यंत वेगाने आणि कोणतीही वेळ न घालवता भरुन काढली.' (हेही वाचा, तब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती)

टेक क्रंचच्या वृत्तानुसार, गेट्स यांनी म्हटले आहे की, त्या वेळी केवळ एकाच नॉन अॅपल ऑपरेटींग सिस्टमसाठी जागा होती ज्याची किंमत होती 400 बिलियन डॉलर (भारतीय रुपयांत तब्बल, 27,76,500 कोटी रुपये) अँड्रॉइड खरेदी न केल्यामुळे बिल गेट्स यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आणि गूगलने बाजी मारली.

सुमारे एक तास इतक्या कालावधीत दिलेल्या मुलाखतीत गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या यशाबाबत कौतुक केले. ते म्हणाले की, 'विंडोज आणि ऑफिस सारख्या प्रॉडक्टमुळे कंपनी एका उंचीवर पोहोचली.' दरम्यान, बिल गेट्स यांना आजही वाईट वाटते की, त्यांनी अँड्रॉइड खरेदी केली नाही. अन्यथा अँड्रॉइडच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट ही आज जगातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असती.