बिल गेट्स (Photo Credit : Youtube)

दीर्घ काळापर्यंत जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती राहिलेले  बिल गेट्स (Bill Gates) पुन्हा एकदा 100 अब्ज डॉलर्स (6.9 लाख कोटी रुपये) क्लबमध्ये सामील झाले आहेत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचे नेटवर्थ जवळपास 6.9 लाख कोटी रुपये झाले आहे. तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा बिल गेट्स यांनी ही कामगिरी करून दाखवली आहे. आता जगात 100 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त संपत्ती असलेल्या दोनच व्यक्ती आहेत, अॅमेझॉनचे संस्थापक सीइओ जेफ बेझोस (Jeff Bezos) आणि बिल गेट्स. जेफ बेजोस यांचा संपत्ती 146 अब्ज डॉलर इतकी आहे.

बिल गेट्स यांची नेटवर्थ 1999 मध्ये प्रथम 100 अब्ज डॉलर्स झाले होते आणि त्यावेळी जेफ यांचे  नेटवर्थ 61.2 हजार कोटी रुपये (890 कोटी डॉलर्स) इतके होते. मात्र जेफ बेजोस यांनी पुढील काही वर्षांतच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला. बिल गेट्स यांच्यापेक्षा जेफ बेजोस यांचा संपत्ती वाढण्याचा वेग अधिक होता. जेफ यांच्या  नेटवर्थमध्ये यावर्षी 1.5 लाख कोटी रुपये (2070 कोटी डॉलर्स) वाढ झाली आहे, तर गेट्स यांचे नेटवर्थ केवळ 65.4 हजार कोटी रुपये (9 50 कोटी डॉलर्स) इतके वाढले आहे. (हेही वाचा: हा आहे जगातील सर्वात महागडा घटस्फोट; एका अफेअरमुळे तुटला 25 वर्षांचा संसार)

बिल गेट्स यांनी आतापर्यंत बिल अँड मिलिंडा गेट्स या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून 35 अब्ज डॉलरपेक्षा जास्त दान केले आहे. तर जेफ यांनी 2018 मध्ये 2 अब्ज डॉलर इतका निधी सामाजिक कार्यासाठी दिला आहे. बिल गेट्स आपली अर्धी संपत्ती दान करणार आहेत हे त्यांनी आधीच सांगितले आहे. तसेच जेफ यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे, त्यामुळे पोटगी दाखल त्यांना आपली अर्धी संपत्ती द्यावी लागू शकते. त्यानंतर मात्र जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान इतर कोणाकडे जाऊ शकतो.