Light Aircraft Crashes Video | (Photo Credits: Twitter)

Helicopter crash in Lagos: नायजेरियाची व्यावसायिक राजधानी लागोस येथे एका छोटेखाणी विमानाचा मोठा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ही घटना लागोस येथे मंगळवारी (1 ऑगस्ट) घडली. प्राप्त माहितीनुसाह हे विमान हवेत उड्डाणाची चाचणी करत होते. दरम्यान, विमानात तांत्रिक अडथळा निर्माण झाला आणि विमान नागरी वस्तीत कोसळले. धक्कादायक म्हणजे हे विमान थेट रस्त्यावरच कोसळले. विमान कोसळताच मोठा स्पोट झाला आणि धुराचे आणि धुळीचे लोट हवेत पसरले.

विमान कोसळत असताना नागरिक रस्त्यावरुन येजा करत होते. व्हिडिओत पाहायला मिळते की, विमान कोसळताच नागरिक सैरावैरा धावत आहेत. नायजेरियन सेफ्टी इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने अपघाताबद्दल माहिती देताना सांगितले की, त्यांनी नोंदणी क्रमांक 5N-CCQ सह जाबिरू J430 हलक्या विमानाच्या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, हे विमान एअर फर्स्ट हॉस्पिटॅलिटी अँड टूर्सद्वारे चालवले जात होते. यात दोन प्रवासी होते. लागोसच्या व्यग्र भागात ओबा अक्रानच्या आसपास ते क्रॅश होण्यापूर्वी. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे ब्युरोने सांगितले.

व्हडिओ

नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीचे लागोस राज्याचे प्रवक्ते इब्राहिम फारिनलोये यांनी सांगितले की, जहाजावरील दोन जणांना जिवंत वाचवण्यात आले. लागोस राज्य आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीचे ओलुफेमी ओके-ओसानिटोलू म्हणाले की लागोसमधील युनायटेड बँक फॉर आफ्रिका इमारतीसमोरील रस्त्यावर एक हेलिकॉप्टर क्रॅश-लँड झाले. त्यानंतर या अपघातात चार जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते.