ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल, जाणुन घ्या यांच्याबद्दल सर्व माहिती...
Parag Agrawal (Photo Credit - Twitter)

ट्विटरचे (Twitter) माजी सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डोर्सी यांच्यानंतर पराग अग्रवाल (Parag Agrawal) हे ट्विटरचे नवे सीईओ म्हणून धुरा सांभाळत आहे. ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल आणि त्यांचे कुटुंबीय मूळचे राजस्थानचे (Rajasthan) आहेत. त्यांचा जन्म राजस्थानमधील अजमेर येथे झाला. पराग यांचे आई-वडील आणि आजी-आजोबा धनमंडी आणि खजाना गली येथे भाड्याच्या घरात राहत होते. पुढे परागच्या वडिलांच्या नोकरीमुळे तो मुंबईला (Mumbai) शिफ्ट झाले आणि तिथेच राहू लागले. मिळालेल्या माहितीनुसार, परागचे आई-वडील 4 डिसेंबरला अजमेरला येणार असून तिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. IIT-Bombay आणि Stanford University चे माजी विद्यार्थी पराग अग्रवाल 2011 पासून Twitter वर काम करत आहेत आणि 2017 पासून कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) आहेत. पराग अग्रवाल ट्विटर कंपनीचे सीईओ बनताच प्रसिद्धीझोतात आले आहे.

पराग यांच्या कुटुंबाला सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला. परागचे आई-वडीलही आता अमेरिकेत राहतात. राजस्थानच्या या सुपुत्राच्या यशाने अजमेरमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. 4 डिसेंबर रोजी परागचे कुटुंब अजमेरला येणार असून, तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. पराग यांची आई निवृत्त शाळेत शिक्षिका आहे. त्यांचे वडील अणुऊर्जा क्षेत्रात कार्यरत होते आणि तिथे वरिष्ठ पदावर होते. (हे ही वाचा Jack Dorsey Resigned from Twitter: जॅक डोर्सी यांनी दिला ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा; Parag Agrawal होणार नवे CEO.)

सीईओ पद मिळाल्यानंतर पराग यांची ट्विटरवर मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. पराग अग्रवाल यांनी आयआयटी मुंबईतून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून संगणक शास्त्रात डॉक्टरेट केली आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत असताना त्यांनी मायक्रोसॉफ्ट, याहू आणि एटी अँड टी सारख्या मोठ्या आणि प्रसिद्ध कंपन्यांमध्ये इंटर्नशिपही केली.

पराग यांनी मुंबईच्या अणुऊर्जा सेंट्रल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. 2005 मध्ये ते अमेरिकेत गेले. 2011 मध्ये, स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएचडी करत असताना त्यांनी ट्विटरवर प्रवेश केला. ट्विटरचे आउटगोइंग सीईओ जॅक डोर्सी यांनी सोमवारी अग्रवाल कंपनीचे नवे सीईओ होणार असल्याची घोषणा केली. डॉर्सी यांनी 16 वर्षांनंतर सीईओ पद सोडले ज्या कंपनीचे ते सह-संस्थापक देखील आहेत.