शास्त्रज्ञांना सोलोमन बेटांच्या (Solomon Islands) पाण्यात एक प्रवाळ (Sea Coral) शोधले आहे. हे प्रवाळ आतापर्यंत सापडलेल्या सर्वात मोठ्या प्रवाळांपैकी एक म्हणून ओळखले गेले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे प्रवाळ 111 फूट रुंदी आणि 104 फूट लांबीचे आहे. जे दोन बास्केटबॉल कोर्टांच्या आकार होईल येवढ्या क्षेत्रावर पसरलेला आहे आणि अंतराळातून सुद्धा दिसतो. नॅशनल जिओग्राफिक प्रिस्टीन सीज मोहिमेच्या चमूने हे संशोधन ऑक्टोबरमध्ये हे संशोधन केले आहे. ज्याने अज्ञात सागरी राक्षसांच्या उपस्थितीवर प्रकाश टाकला आहे.
पाण्याखालील एक प्रचंड चमत्कार
या मोहिमेतील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मॉली टिमर्स यांनी प्रवाळांचे वर्णन पृष्ठभागावरून दिसणाऱ्या "जहाजाच्या भग्नावशेषासारखे" असल्याचे केले. पाण्याखालील शोधामुळे त्याचा (प्रवाळाचा) विस्तीर्ण आकार दिसून आला. ज्यात तपकिरी, पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या लाटा समुद्रसपाटीवर पसरल्याचे आढळून आले. हे प्रवाळ साधारण 300 ते 500 वर्षे जुने असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे प्रभावळ अमेरिकन सामोआमध्ये असलेल्या 'बिग मॉमा' या आधीच्या सर्वात मोठ्या प्रवाळाला मागे टाकले आहे. प्रिस्टीन सीजचे संस्थापक डॉ. एनरिक साला यांनी सागरी जैवविविधतेतील त्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देत या शोधाची तुलना 'जगातील सर्वात उंच वृक्ष' शोधण्याशी केली. हाँगकाँग विद्यापीठातील प्रवाळ खडक तज्ज्ञ डॉ. डेव्हिड एम. बेकर यांनी अशा मोठ्या प्रवाळ संरचनांच्या लवचिकतेवर प्रकाश टाकला आणि शतकानुशतके पर्यावरणीय बदलांद्वारे त्यांचे अस्तित्व लक्षात घेतले. (हेही वाचा, Uneven Monsoon Rains in India: भारतात मान्सून पाऊस असमान, देशातील 25% प्रदेश अद्यापही कोरडाच; स्थानिकांना येईना हवामान अंदाज)
प्रवाळ निरोगी दिसत असले तरी, शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, त्याला स्थानिक आणि जागतिक ताणतणावांच्या लक्षणीय जोखमींचा सामना करावा लागतो. जास्त प्रमाणात मासेमारी केल्याने प्रवाळांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या प्रजाती काढून प्रवाळ खडकांच्या परिसंस्थांच्या नाजूक संतुलनात व्यत्यय येतो. मोठ्या प्रमाणावर, हवामान बदल आणि समुद्राचे तापमान वाढल्याने प्रवाळ विरंजन होऊ शकते, ही परिस्थिती कायम राहिल्यास प्रवाळ मृत्यूला कारणीभूत ठरते.
सॉलोमन बेटांवर 490 हून अधिक कठीण आणि मऊ प्रवाळांच्या प्रजाती आहेत. ज्यामुळे त्या जगातील सर्वात जैवविविध सागरी परिसंस्थांपैकी एक बनल्या आहेत. हा शोध केवळ महासागरातील लपलेल्या आश्चर्यांवर प्रकाश टाकत नाही तर जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने संवर्धनाच्या प्रयत्नांची तातडीची गरज देखील अधोरेखित करतो. या विशाल प्रवाळांचा शोध महासागराच्या असुरक्षिततेची स्पष्ट आठवण करून देतो. पाण्याखालील या चमत्कारांचे संरक्षण करणे केवळ सागरी जैवविविधतेसाठीच नव्हे तर त्यांच्या उपजीविकेसाठी प्रवाळ खडकांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांसाठी देखील महत्त्वाचे आहे.