Kim Jong Un Orders Capital Punishment: उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन(Kim Jong Un) हे त्यांच्या निर्णय, कायदे आणि भयावह शिक्षांसाठी नेहमी चर्चेत असतात. ते ऐकून लोकांच्या मनाचा थरकाप उडतो. त्यांच्या विक्षिप्तपणामुळे ते जगातील सर्वात धोकादायक नेते मानले जातात. अमेरिकाही किंबहूना किम जोंग यांना घाबरते. किम जोंग उन हे इतर देशांसाठीच सक्त वागत नाहीत तर ते त्यांच्या देशातील लोकांसाठीही अत्यंत कठोर वागतात. त्याचाच प्रयत्य म्हणून कामात भ्रष्टाचार केलेल्या काही अधिकाऱ्यांना त्यांनी फाशीची शिक्षा(Capital Punishment) सुनावली. सध्या त्यांच्या या निर्णयाची चर्चा संपूर्ण जगात होत आहे. (हेही वाचा:Vladimir Putin And Kim Jong Un Car Incident: आगोदर कोण? व्लादिमीर पुतीन आणि किम जोंग उन यांच्या भेटीदरम्यान घडला मजेशीर प्रसंग, (Watch Video) )
किम जोंग उन यांनी त्यांच्या 30 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली पूरस्थिती आणि भूस्खलन रोखण्यात सरकार अयशस्वी ठरल्याबद्दल 30 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा ठोठावल्याचे सांगितले जाते. उत्तर कोरियामध्ये आलेल्या पुरामुळे सुमारे चार हजार लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या काळात उत्तर कोरियातील 20 ते 30 अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार आणि कर्तव्यात दोषी ठरल्याचा आरोप करण्यात आला. गेल्या महिन्याच्या अखेरीस पूरग्रस्त भागात एकाच वेळी 20 ते 30 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचे वृत्त आहे.
उत्तर कोरियाच्या सेंट्रल न्यूज एजन्सीने यापूर्वी वृत्त दिले होते की जुलैमध्ये चगांग प्रांतात आलेल्या आपत्तीजनक पुरानंतर किमने अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचे आदेश दिले होते. या पुरामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना जीव गमवावा लागला. तर, 15,000 हून अधिक लोक बेघर झाले होते. फाशी देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची ओळख उघड झालेली नाही, जरी मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले की, किम जोंग उन यांनी पुराच्या वेळी आपत्कालीन बैठकीत अनेक अधिकाऱ्यांना बडतर्फ केले होते.
पुरामुळे संतापले; 30 अधिकाऱ्यांना सुनावली फाशी
Kim Jong-un executes 30 officials over floods in North Korea that killed 4,000: report https://t.co/170bENURZa pic.twitter.com/SqAPY0u9kc
— New York Post (@nypost) September 3, 2024
किम जोंग गेल्या काही महिन्यांत पूरग्रस्त भागाचे सर्वेक्षण करताना आणि रहिवाशांना भेटताना दिसले. सरकारी यंत्रणांच्या अपयशाबद्दल अधिका-यांवर कठोर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्ये, किम आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील शिखर परिषदेची वाटाघाटी करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल किम सरकारने अमेरिकेतील आण्विक दूत किम ह्योक चोल यांना फाशी दिली होती. मात्र, तेव्हा किम ह्योक चोल यांना केवळ कोठडीत ठेवल्याचे उघड झाले होते.