कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. कोरोना विषाणूची लागण होऊन आतापर्यंत 26 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 लाखांहून अधिक नागरिकांना याची लागण झाली आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने इटलीत हाहाकार माजवला आहे. इटलीत (Italy) एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनामुळे इटलीत गेल्या 24 तासात जवळपास 1000 नागरिकांचा बळी गेला आहे. इटलीत गेल्या आठवड्यात मृतांच्या संख्येत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इटलीत आज शक्रवारी 919 नागरिकांना आपला जीव गमावला आहे. तर, 26 हजार 350 लोकांना याची लागण झाली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
एका दिवसात होणाऱ्या मृत्यूच्या यादीत इटनंतर इराण आणि स्पेनचा नंबर लागलो. एका दिवसात इराणमध्ये 600हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर, स्पेनने 569 लोकांच्या मृत्यूची नोंद केली होती. तसेच स्पेन येथे एकूण मृतांची संख्याने 4 हजार 934 चा आकडा गाठला आहे. जगातील सर्वाधिक बलाढ्य देश अमेरिकने आपल्या नावावर निराशाजनक विक्रम केला आहे. अमेरिकेत सर्वाधिक 93 हजार 329 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 384 लोकांचा मृत्यू झाला आहे. याआधी चीनमध्ये 81 हजार 340 लोक कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकले होते. तसेच कोरोनामुळे चीन येथे 3 हजार 292 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: अमेरिकेत बेरोजगारीने मोडला विक्रम; तब्बल 33 लाख लोकांनी केला Unemployment Benefits साठी अर्ज
एएनआयचे ट्वीट-
Italy records almost 1,000 #COVID19 related deaths, highest in a day: AFP news agency
— ANI (@ANI) March 27, 2020
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 लाखांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाल्याची माहिती आकडेवारी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत एकूण 724 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. यात 18 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, त्यापैंकी 45 नागरिक बरे झाल्याचेही सांगितले जात आहे.